Shocking : भयंकर! दिराने वहिनीचे अंघोळीचे व्हिडिओ काढले, व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केला

Madhya Pradesh Crime News : मध्य प्रदेशात महिलेचे दिराने खासगी व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
KHANDWA WOMAN ACCUSES BROTHER-IN-LAW OF RAPE AFTER BLACKMAIL WITH PRIVATE VIDEO, CASE REGISTERED
KHANDWA WOMAN ACCUSES BROTHER-IN-LAW OF RAPE AFTER BLACKMAIL WITH PRIVATE VIDEO, CASE REGISTEREDSaam Tv
Published On
Summary
  • खंडवा जिल्ह्यातील खालवा परिसरात धक्कादायक घटना

  • विवाहित महिलेने दिराविरुद्ध गंभीर आरोप केले.

  • आरोपीने महिलेचा अंघोळ करताना व्हिडिओ काढला

  • ब्लॅकमेल करून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा दावा

Madhya Pradesh Crime News मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील खालवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळिमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. एका ३० वर्षीय विवाहित महिलेने आपल्या दिरावर ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित महिलेचा दीर असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी तो दोन दिवसांसाठी महिलेच्या घरी राहण्यासाठी आला होता. याच काळात त्याने महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ तिच्या नकळत मोबाईलमध्ये काढला. त्यानंतर आरोपीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देत महिलेला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली.

KHANDWA WOMAN ACCUSES BROTHER-IN-LAW OF RAPE AFTER BLACKMAIL WITH PRIVATE VIDEO, CASE REGISTERED
Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

पीडितेच्या म्हणण्यानुसार, बदनामीची भीती आणि कुटुंबामुळे ती बराच काळ गप्प राहिली. मात्र आरोपीने या परिस्थितीचा गैरफायदा घेत वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अत्याचार आणि मानसिक छळ असह्य झाल्यानंतर महिलेने धाडस दाखवत खालवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

KHANDWA WOMAN ACCUSES BROTHER-IN-LAW OF RAPE AFTER BLACKMAIL WITH PRIVATE VIDEO, CASE REGISTERED
Gold Rate Update : ग्राहकांसाठी सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या ताजे भाव

तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कारासह संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. सध्या आरोपी फरार असून आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. पीडित महिलेचे जबाब नोंदवण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com