Gold Rate Update : ग्राहकांसाठी सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या ताजे भाव

Today Gold Silver Rate Update News : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! आज सोन्याच्या दरात घसरण झाली असून 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे नवीन दर जाहीर झाले आहेत. मुंबई, पुणेतील आजचे ताजे सोने-चांदीचे भाव जाणून घ्या.
GOLD PRICE DROPS TODAY: CHECK LATEST 24K, 22K & 18K GOLD RATES IN INDIA
GOLD PRICE DROPS TODAY: CHECK LATEST 24K, 22K & 18K GOLD RATES IN INDIASaam Tv
Published On
Summary
  • आज सोन्याच्या दरात घसरण

  • 24 कॅरेट सोन्याचा दर 15,611 रुपये प्रति ग्रॅम

  • मुंबई आणि पुण्यात सोन्याचे दर समान असून खरेदीदारांना दिलासा

  • चांदीचे दर आज स्थिर

Gold Silver Price Today 4th June Update Indian Market सोने चांदी खरेदी दारांसाठी आनंदाची बातमी! लग्नकार्य किंवा गुंतवणुकीसाठी सोने चांदी खरेदी करणार असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी सुवर्णदिवस ठरणार आहे. कारण आज सराफा बाजार उघडताच सोन्याचे दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. गुड रिटर्न्सनुसार आजचे 24k १ तोळाचे दर १,५६,११० रुपये असून ११० रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीचे दर स्थिर आहेत. दरम्यान आखाती देशांत सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम सोने चांदीच्या दरांवर होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १५,६११

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,२४,८८८

  • १० ग्रॅम: आजचे दर १,५६,११०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १५,६१,१००

GOLD PRICE DROPS TODAY: CHECK LATEST 24K, 22K & 18K GOLD RATES IN INDIA
Monsoon Update : पुढील काही तासांत केरळमध्ये मान्सून धडकणार, राज्यात मुसळधार पाऊस; 'या' जिल्ह्यांना अलर्ट, वाचा IMD चा अंदाज

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १४,३१०

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,१४,४८०

  • १० ग्रॅम: आजचे दर १,४३,१००

  • १०० ग्रॅम: आजचे दर १४,३१,०००

GOLD PRICE DROPS TODAY: CHECK LATEST 24K, 22K & 18K GOLD RATES IN INDIA
Shocking : ३ मुलांसमोर फ्रेंच महिलेवर सामूहिक बलात्कार; कोर्टाने दिली फाशीची शिक्षा

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर ११,७०८

  • ८ ग्रॅम: आजचे दर ९३,६६४

  • १० ग्रॅम: आजचे दर १,१७,०८०

  • १०० ग्रॅम: आजचे दर ११,७०,८००

GOLD PRICE DROPS TODAY: CHECK LATEST 24K, 22K & 18K GOLD RATES IN INDIA
Nandurbar : महाराष्ट्रातील दुर्गम पाड्यावर पहिल्यांदाच चमत्कार घडला! गावकऱ्यांसह लहान मुलं आनंदानं उड्या मारायला लागले

मुंबई, पुण्यामध्ये सोन्याचे दर किती?

गुड रिटर्न्सच्या माहितीनुसार, आज सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर घसरले असून मुंबईत (Mumbai Gold Rate Today) २४k चे दर १५,६११ रुपये आहे, २२k चे दर १४,३१० रुपये , तर १८k चे दर ११,७०८ रुपये आहेत. तसेच पुण्यात २४k चे दर १५,६११ रुपये आहे, २२k चे दर १४,३१० रुपये, तर १८k चे दर ११,७०८ रुपये आहेत. दिल्लीत मात्र सोन्याचे दर १५,६२६ इतके आहेत. दरम्यान सोने गुंतवणूक आणि खरेदीदारांसाठी हा सुवर्णकाळ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com