Shruti Vilas Kadam
उकडलेले बटाटे, पनीर, कॉर्नफ्लोअर, मीठ, मिरची पावडर आणि ड्रायफ्रूट्स एकत्र करून कोफ्त्याचे मिश्रण तयार करा. यामुळे कोफ्ते मऊ आणि चविष्ट बनतात.
बटाटा आणि पनीर मिश्रणाचे छोटे गोळे तयार करा. मध्ये ड्रायफ्रूट्स भरून गोल आकार द्या आणि गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
कांदा, टोमॅटो, काजू, आलं-लसूण पेस्ट, क्रीम आणि मसाले वापरून मलाईदार ग्रेव्ही तयार केली जाते. यामुळे डिशला रेस्टॉरंटसारखी चव येते.
कांदा आणि टोमॅटो परतून त्याची पेस्ट तयार करा. त्यात मसाले आणि क्रीम घालून मंद आचेवर शिजवा. ग्रेव्ही घट्ट आणि स्मूद होईपर्यंत ढवळत राहा.
सर्व्ह करण्याच्या अगोदरच कोफ्ते ग्रेव्हीत घाला. त्यामुळे कोफ्ते नरम राहतात आणि तुटत नाहीत. आधी घातल्यास ते जास्त मऊ होऊ शकतात.
मलाई कोफ्ता बटर नान, तंदुरी रोटी, पराठा किंवा जिरा राईससोबत खूप स्वादिष्ट लागतो. खास पाहुण्यांसाठी ही उत्तम डिश ठरू शकते.
ग्रेव्हीत थोडं कसुरी मेथी आणि फ्रेश क्रीम घातल्यास मलाई कोफ्त्याची चव आणखी वाढते. वरून कोथिंबीर सजवल्यास डिश आकर्षक दिसते.