Shruti Vilas Kadam
आज माधुरी दीक्षितचा वाढदिवस आहे. माधुरीने अवघ्या तीनव्या वर्षी कथक शिकायला सुरुवात केली होती. तिने जवळपास आठ वर्षे कथकचे शिक्षण घेतले आणि लहान वयातच शिष्यवृत्तीही मिळवली.
माधुरी दीक्षितची पहिली फिल्म अबोध होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला, पण याच चित्रपटामुळे त्यांच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले.
तेजाब मधील ‘एक दो तीन’ गाण्यामुळे माधुरी रातोरात स्टार बनली. तिच्या डान्समुळे प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं.
१९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या बेटा चित्रपटातील ‘धक धक करने लगा’ या गाण्यामुळे तिला ‘धक-धक गर्ल’ ही ओळख मिळाली. हे गाणं आजही प्रचंड लोकप्रिय आहे.
माधुरी दीक्षितने हम आपके है कौन..!, दिल तो पागल है, देवदास यांसारख्या सुपरहिट चित्रपटांत काम करत हिंदी सिनेसृष्टीत वेगळी छाप निर्माण केली.
आजही माधुरी दीक्षितची लोकप्रियता कायम आहे. तिच्या अभिनयासोबतच नृत्यकौशल्याचं सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये मोठं कौतुक केलं जातं. अनेक चाहते तिला आजही बॉलिवूडची ‘डान्सिंग क्वीन’ मानतात.
पण, माधुरी दीक्षितला लहानपणापासून विज्ञान विषयाची आवड होती. ती अभिनय क्षेत्रात नव्हे तर पॅथॉलॉजिस्ट बनण्याचं स्वप्न पाहत होती. पण आज अभिनेत्री एक उत्तम अभिनेत्री आणि डान्सर आहे.