Shocking: नदीत बुडून ३ सख्ख्या भावांचा मृत्यू; पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली, पण बाहेर आलेच नाहीत

Bihar News: बिहारच्या करेह नदीमध्ये बुडून ३ सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. हे तिघेही अंघोळीसाठी नदीवर गेले होते. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तिघेही वाहून गेले. या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
Shocking: नदीत बुडून ३ सख्ख्या भावांचा मृत्यू; पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली, पण बाहेर आलेच नाहीत
Bihar Shocking NewsSaam Tv
Published On

Summary -

  • बिहारमध्ये तीन सख्ख्या भावांचा नदीत बुडून मृत्यू

  • अंघोळीसाठी तिघेही नदीवर गेले होते

  • नदीमध्ये त्यांनी उडी मारली पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते वाहून गेले

  • दोन मृतदेह सापडले असून तिसऱ्याचा शोध घेतला जात आहे

बिहारमध्ये एकाच कुटुंबातील ३ मुलांचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील शिवाजीनगर प्रखंडमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तिन्ही मुलं एकाच कुटुंबातील आहेत. घटनेची माहिती मिळताच ते राहत असलेल्या गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही मुलं अंघोळीसाठी करेह नदीवर गेले होते. ही नदी बरियाही घाट पुलाजवळून जाते. या पुलावरून मुलांनी नदीमध्ये उडी मारली. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघांचा देखील नदीत बुडून मृत्यू झाला. नदीचा प्रवाह जास्त असल्यामुळे तिन्ही मुलं वाहून गेली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांनी या घटनेची माहिती दिली.

Shocking: नदीत बुडून ३ सख्ख्या भावांचा मृत्यू; पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली, पण बाहेर आलेच नाहीत
Shocking: क्षणात सर्वकाही संपलं! पिस्तूल छातीवर लावलं अन् ट्रिगर ओढला, रीलच्या नादात तरुणाने गमावला जीव; थरारक VIDEO

स्थानिक प्रशासनाने गावकऱ्यांच्या मदतीने दोन मुलांचे मृतदेह शोधून काढत नदीबाहेर काढले. एका मुलाचा मृतदेह अद्याप सापडला नाही त्याचा शोध घेतला जात आहे. एसडीआरएफ सर्च ऑपरेशन करत आहे. तिन्ही मुलं परसा पंचायतमधील बोरज गावातील रहिवासी होते. तिन्ही मुलं सख्खे भाऊ होते. एकाच दिवशी तिन्ही मुलांचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला.

Shocking: नदीत बुडून ३ सख्ख्या भावांचा मृत्यू; पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली, पण बाहेर आलेच नाहीत
Shocking: लग्नाच्या हॉलमध्ये 'गंदाकाम', ४१ खोल्यांमध्ये ८० तरुण अन् तरुणींना नको त्या अवस्थेत पकडलं; पोलिसांनी छापा टाकताच...

बोरज गावामध्ये राहणाऱ्या सुदर्शन झा यांची ही मुलं होती. आदित्य कुमार झा (१५ वर्षे), हर्षनाथ कुमार झा (१३ वर्षे) आणि कार्तिक कुमार झा (११ वर्षे) अशी मृत मुलांची नावं आहेत. सुदर्शन यांचा सर्वात छोटा मुलगा कार्तिकचा मृतदेह अद्याप सापडला नाही. पोटच्या तिन्ही मुलांचा मृत्यू झाल्यामुळे सुदर्शन आणि त्यांच्या बायकोचे रडून रडून बेहाल झाले आहे.

Shocking: नदीत बुडून ३ सख्ख्या भावांचा मृत्यू; पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली, पण बाहेर आलेच नाहीत
Shocking : भयंकर घटना! इंटरव्ह्यूला बोलावून तरूणीला जिवंत जाळलं, पीडिता आणि आरोपीमध्ये नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com