

रीलच्या नादात तरुणाचा मृत्यू
पिस्तूल छातीवर ठेवून ट्रिगर ओढला
छातीत गोळी घुसल्याने तरुणाचा मृत्यू
थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
दिल्लीमध्ये एका तरुणाने रिलच्या नादात आपला जीव गमावला. दिल्लीच्या दल्लूपुरा परिसरातून ही धक्कादायक घटना घडल असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरुणाने स्वत:च्या छातीवर पिस्तूल ठेवलं आणि ट्रिगर दाबला. छातीत गोळी घुसल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे दिल्लीत खळबळ उडाली आहे.
मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव पवन होते. पवनच्या चुलतभावाकडे परवाना असलेले पिस्तूल होते. पवन हे पिस्तूल हातात घेऊन रील करत होता आणि त्याचा चुलत भाऊ मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करत होता. पण पिस्तूलसोबत स्टंट करत असताना भयंकर घडलं. पनवने मॅगझिन लोड करून ते पिस्तूलमध्ये भरले. त्यानंतर त्याने पिस्तूल छातीवर ठेवले आणि ट्रिगर ओढला. पिस्तूलमधून गोळी सुटून ती थेट पवनच्या हृदयाला लागली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दिल्लीच्या न्यू अशोक नगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पवनचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी एलबीएस रुग्णालयात पाठवला.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, १६ मार्च २०२६ रोजी न्यू अशोक नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धर्मशिला रुग्णालयात एका तरुणावर गोळीबार झाल्याची तक्रार मिळाली होती. पोलिस रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्यांना कळाले की गोळी लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला. दल्लूपुरा येथील रहिवासी असलेल्या पवन कुमारच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली होती. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पवनने ज्या ठिकाणी गोळी झाडून घेतली त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक परवानाधारक पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसे आणि एक मोबाईल फोन जप्त केला.
पवन आणि त्याचा चुलत भाऊ हिमांशू परवानाधारक पिस्तुल हातात घेऊन स्टंट करत होते. मोबाईलमध्ये ते रील शूट करत होते. त्यावेळी ही भयंकर घटना घडली आणि पवनचा मृत्यू झाला. पोलिसांनी हिमांशूचा मोबाईल जप्त केला. या मोबाईलमध्ये या संपूर्ण भीषण घटनेचा व्हिडिओ आहे. पोलिसांनी न्यू अशोक नगर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम १०५ (सदोष मनुष्यवध) आणि शस्त्र कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी एलबीएस रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.