Viral Video: एक्स गर्लफ्रेंड स्टेजवर आली, नवऱ्याला Kiss केलं, त्यानंतर नवरीने जे काही केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Viral wedding video: एका लग्नसमारंभात नवऱ्याची एक्स गर्लफ्रेंड स्टेजवर आल्यामुळे झालेल्या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेवर नवरीने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे इंटरनेटवर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Viral wedding video
Viral wedding videoSAAM TV
Published On

लग्न म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस असतो. मात्र सध्या सोशल मीडियावर लग्न समारंभातील एक अशी घटना व्हायरल झालीये, जी पाहून सर्वजण हैराण झालेत. एक घटना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतेय. इंडोनेशियामधील एका लग्नाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून त्यामध्ये नवऱ्याची एक्स गर्लफ्रेंड स्टेजवर आल्याने जो गोंधळ झालाय तो कॅमेरात कैद झाला आहे.

सोशल मिडीयावर व्हायरल झाला व्हिडीओ

सोशल मीडियावर शेअर झालेल्या या व्हिडिओमध्ये लग्नानंतर सुरू असलेले फोटो सेशन पाहयला मिळतंय. अशातच नवरा-नवरी स्टेजवर उभे असताना एक मुलगी पुढे येते. ही मुलगी नवऱ्याची एक्स गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलंय. ती स्टेजवर येऊन नवऱ्याच्या हाताला किस्स करते. दरम्यान हा संपूर्ण प्रकार पाहून नवरीचा संताप अनावर होतो.

Viral wedding video
Social Media Banned: १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बॅन; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

व्हिडिओमध्ये दिसून येतंय की, एक्स गर्लफ्रेंडचं कृत्य पाहता नवरी तात्काळ रिएक्ट करते. नरी तिचे केस पकडून तिला जोरात खाली ढकलून देते. या अचानक घडलेल्या घटनेमुळे लग्नसमारंभात उपस्थित असलेले लोक क्षणभर गोंधळून जातात. काही जण परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @NewsAlgebraIND या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला एक लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगितलंय की, ही घटना इंडोनेशियामधील एका लग्नसमारंभात घडलीये.

Viral wedding video
Viral Video : पुण्यात पोलिसांनीच कायदा मोडला, दुचाकीवर ट्रिपल सीट फिरतानाचा कॅमेऱ्यात कैद

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसतायत. काही युजर्सनी नवरीच्या रिएक्शनला योग्य म्हणत 'अशा परिस्थितीत कोणालाही राग येऊ शकतो,' असं म्हटलंय. तर काही लोकांनी, एक्स गर्लफ्रेंडने असं वागायला नको होतं अशी कमेंट केलीये.

Viral wedding video
Viral Video: शाळेच्या कार्यक्रमात मुलींचा अश्लील 'टॉवेल डान्स' व्हायरल; सोशल मीडियावर रंगली जोरदार चर्चा

(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com