Viral Video: शाळेच्या कार्यक्रमात मुलींचा अश्लील 'टॉवेल डान्स' व्हायरल; सोशल मीडियावर रंगली जोरदार चर्चा

Kolkata school cultural program towel dance video viral: कोलकात्यातील एका शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमातील विद्यार्थिनींच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये टॉवेल गुंडाळून केलेल्या डान्सवरून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
Kolkata school cultural program towel dance video viral
Kolkata school cultural program towel dance video viralsaam tv
Published On

पश्चिम बंगालमधील एका शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमातील डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये काही मुली स्टेजवर डान्स करताना दिसतायत. यामध्ये या मुली टॉवेल गुंडाळून डान्स करताना दिसतायत. हा कार्यक्रम कोलकात्यातील जीबन ज्योती मॉडेल स्कूलमध्ये झाल्याचा दावा करण्यात येतोय. या घटनेवरून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

व्हिडिओत नेमकं काय दिसतं?

व्हायरल झालेल्या या लहानशा क्लिपमध्ये काही विद्यार्थिनी स्टेजवर डान्स करताना दिसतात. डान्स करताना त्यांनी अंगावर टॉवेल गुंडाळलेलं असल्यामुळे अनेकांनी या डान्सला 'टॉवेल डान्स' असं म्हटलं जातंय. स्टेजच्या मागे शाळेचं नाव असलेला बॅनरही या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येतोय. कार्यक्रमादरम्यान अनेक विद्यार्थी प्रेक्षकांमध्ये बसून हा परफॉर्मन्स पाहता आनंद घेत असल्याचं कॅमेरात कैद झालं आहे.

Kolkata school cultural program towel dance video viral
Pune: कडेवरील मुलाचा हात लिफ्टच्या सापटीत अडकला, त्यानंतर जे घडलं ते पाहून काळीज चिरेल, पाहा व्हिडिओ

हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच तो व्हायरल झाला. यावेळी त्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. काहींनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर संतापाच्या प्रतिक्रिया

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सने यावर नाराजी व्यक्त केल्याचं दिसून येतंय. काहींनी हा प्रकार शाळेच्या मुलांसाठी योग्य नसल्याचं म्हटलंय. अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की, शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात अशा प्रकारचा डान्स शिक्षकांनी होऊच कसा दिला. काही अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाची चौकशी करावी अशी मागणीही केल्याची माहिती आहे.

Kolkata school cultural program towel dance video viral
Viral Video: केस ओढले, लाथा बुक्क्यांनी मारहाण अन्....; विद्यापीठात विद्यार्थिनींचा राडा

शाळेने यासंदर्भात का दिली प्रतिक्रिया?

एका सोशल मीडिया युजरने असा दावा देखील केला की, हा कार्यक्रम कदाचित शाळेने आयोजित केलेला नसावा. त्याच्या मते एखाद्या स्थानिक क्लबने कार्यक्रम आयोजित केला असू शकतो आणि फक्त शाळेचा बॅनर वापरला गेला असावा.

Kolkata school cultural program towel dance video viral
Viral Video: ऑटोवाला दिवसाला ७५ हजार कमावतो? त्या व्हायरल व्हिडिओनंतर सर्वांनाच बसला धक्का, पण नेमकं सत्य काय?

(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com