Viral Video: केस ओढले, लाथा बुक्क्यांनी मारहाण अन्....; विद्यापीठात विद्यार्थिनींचा राडा

Girl students fight video: विद्यापीठाच्या कॅम्पसमधील मेसमध्ये दोन गटांतील विद्यार्थिनींमध्ये जोरदार मारामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करून हा वाद शांत केल्याची माहिती समोर आली आहे.
Girl students fight video
Girl students fight videoSAAM TV
Published On

हरियाणातील सोनीपतमध्ये असलेल्या ओपी जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थिनींनमध्ये झालेल्या जोरदार मारामारीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुमारे 23 सेकंदांचा हा व्हिडिओ कॅम्पसमधील मेसमध्ये झालेल्या वादाचा असल्याची माहिती आहे. या व्हिडिओमध्ये काही विद्यार्थिनी एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारताना, केस ओढताना आणि कानाखाली मारताना दिसतायत.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन गटांतील विद्यार्थिनींमध्ये अचानक वाद सुरू झाला आणि तो काही क्षणांतच हाणामारीपर्यंत पोहोचला. व्हिडिओमध्ये एक विद्यार्थिनी दुसऱ्या विद्यार्थिनीचे केस पकडून जोरात ओढताना दिसतेय. त्याच वेळी ती तिला कानाखाली मारत असल्याचंही दिसून येतंय. या घटनेदरम्यान इतर काही विद्यार्थिनी वाद सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र काही वेळाने पुन्हा दोन्ही गटांमध्ये मारामारी सुरू झाल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसून येतंय.

Girl students fight video
Pune: कडेवरील मुलाचा हात लिफ्टच्या सापटीत अडकला, त्यानंतर जे घडलं ते पाहून काळीज चिरेल, पाहा व्हिडिओ

वाद वाढल्यानंतर कॅम्पसमधील बॉडीगार्ड घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींना मारहाण करण्यापासून रोखलं. बॉडीगार्डने मध्यस्थी केल्यानंतर काही वेळातच हा वाद शांत झाला.

Girl students fight video
Viral Video: होणाऱ्या नवऱ्याला पाहताच मंडपात नवरीच्या अश्रूंचा पूर; लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

या प्रकरणाबाबत विद्यापीठ प्रशासनानेही प्रतिक्रिया दिली आहे. युनिव्हर्सिटीच्या पीआरओ अंजू मोहन यांनी सांगितलं की, विद्यार्थिनींमध्ये आपापसातील वाद झाला होता. कॅम्पसमध्ये सुमारे 11 हजार विद्यार्थी शिकतात. इतक्या मोठ्या परिसरात कधी-कधी अशा वादाच्या घटना घडू शकतात. हा वाद विद्यार्थिनींमध्येच आपापसात सोडवण्यात आला असून या प्रकरणात पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com