Viral Video: होणाऱ्या नवऱ्याला पाहताच मंडपात नवरीच्या अश्रूंचा पूर; लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
सोशल मीडियावर सध्या एका लग्नाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये लग्नाच्या मंडपात वधू आणि वर बसलेले दिसतायत. यावेळी तिच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी स्पष्ट नाराजी दिसून येतंय. हा व्हिडिओ पाहून युजर्स देखील आश्चर्यचकित झाले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक त्यांना आशीर्वाद देताना दिसतात. काही जण नव्या नवरा-नवरीसोबत आनंदाने फोटोही काढत आहेत. संपूर्ण वातावरण उत्साही आणि आनंदाचे असल्याचं पाहायला मिळतंय. या सर्वांमध्ये वधूचा चेहरा मात्र काहीतरी वेगळीच कहाणी सांगत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय.
व्हिडिओमध्ये नवरी सतत रडताना दिसतेय. ती तिचा संपूर्ण चेहरा हाताने झाकून घेते. काही क्षणांसाठी ती नवऱ्याकडे पाहते आणि पुन्हा रडू लागते. स्टेजवर उपस्थित असलेले लोक तिला समजावण्याचा प्रयत्न करताना दिसतात. तरीही तिच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं तिला कठीण जात असल्याचं पाहायला मिळतंय.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय आहे. या व्हिडिओला साडेसात लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया
हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी एका युजरने, भारतात अरेंज मॅरेज बॅन केलं पाहिजे. तर अजून एका युजरने म्हटलंय की, लग्नापूर्वी वधूने वराला अजिबात पाहिलं नव्हतं का. दरम्यान हा व्हिडीओ नेमका कुठचा आहे याची माहिती मिळालेली नाही
(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

