Pune: कडेवरील मुलाचा हात लिफ्टच्या सापटीत अडकला, त्यानंतर जे घडलं ते पाहून काळीज चिरेल, पाहा व्हिडिओ

Child hand trapped in lift door cctv video: पिंपरी-चिंचवडच्या दिघी परिसरातील एका सोसायटीमध्ये लिफ्टचा दरवाजा बंद होताना एका चिमुकलीचा हात अडकण्याची धक्कादायक घटना घडली.
Pune
Punesaam tv
Published On

पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरातील एका सोसायटीत घडलेल्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय. लिफ्टमध्ये असताना एका चिमुकलीने दरवाजावर हात ठेवला आणि लिफ्ट मजल्यावर थांबल्यानंतर दरवाजा बंद होत असताना तिचा हात दरवाजाच्या सापटीत अडकला. यावेळी लिफ्टमध्ये सर्वजण घाबरले. मात्र उपस्थितांनी तत्परतेने प्रयत्न करत अखेर त्या मुलीचा हात सुरक्षित बाहेर काढला.

लिफ्टच्या कॅमेरात कैद झाली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, दिघीतील एका निवासी सोसायटीमध्ये ही घटना घडलीये. त्या वेळी लिफ्टमध्ये दोन महिला आणि त्यांच्या हातात एक-एक लहान बाळ होतं. याशिवाय तीन व्यक्ती आधीच उपस्थित होते. लिफ्ट मजल्यावर पोहोचल्यानंतर दरवाजा बंद होत असताना मुलीने दरवाजावर हात ठेवला. दरवाजा बंद होताच तिचा हात सापटीत अडकला. हा प्रकार लक्षात येताच लिफ्टमधील महिला आणि इतर लोकं घाबरून गेले.

Pune
LPG cylinder shortage: गॅस सिलिंडर संपला, कामगारांनी देसी जुगाड करत बनवलं जेवण; VIDEO व्हायरल

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याप्रमाणे, काही क्षणांसाठी परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. लिफ्टमधील लोकांनी तत्काळ मुलीचा हात बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही मिनिटं प्रयत्न केल्यानंतर अखेर मुलीचा हात सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं. सुदैवाने या घटनेत मुलीला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.

Pune
Viral Video: गॅस टंचाईच्या संकटात चोरांचा सुळसुळाट, घराबाहेर ठेवलेला सिलिंडर घेऊन पळाले; VIDEO व्हायरल

हा संपूर्ण प्रकार सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून चिंता व्यक्त केली आहे. या घटनेनंतर सोसायटीतील रहिवाशांनीही लिफ्ट वापरताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय. विशेषतः लहान मुले लिफ्टमध्ये असताना त्यांच्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे.

Pune
Mobile phone explosion: गेम खेळताना हातात मोबाइलचा स्फोट, चिमुकलीला गंभीर दुखापत; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com