

मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता भारतावरही दिसून येतात. यामुळे देशात एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा झाल्याचं चित्र दिसून येतंय. अशातच कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये सिलेंडर चोरीच्या घटना समोर आल्यात. बंगळुरू जिल्ह्यातील चन्नपट्टणामध्ये घराबाहेर ठेवलेले एलपीजी सिलेंडर चोरीला गेल्याचे दोन प्रकार घडले असून या घटनांचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
सध्या देशातील अनेक भागांमध्ये एलपीजी सिलेंडर मिळवण्यासाठी लोकांना पहाटेपासून गॅस एजन्सीबाहेर रांगेत उभं राहावं लागतंय. काही ठिकाणी लोक सकाळी चार वाजल्यापासून सिलेंडर घेण्यासाठी थांबले असल्याचं चित्र आहे. एजन्सी उघडेपर्यंत ग्राहकांची रांग काही ठिकाणी 500 मीटरपर्यंत पोहोचत असल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर बंगळुरूमधील नागरभावी परिसरात घडलेली सिलेंडर चोरीची घटना चर्चेत आलीये. सीसीटीव्ही फुटेजनुसार, एक माणूस रात्रीच्या वेळी बाईकवरून येते. त्यानंतर तो घराबाहेर ठेवलेला एलपीजी सिलेंडर उचलून त्याने आणलेल्या गोणीत टाकतो आणि काही निघून जातो.
दुसऱ्या दिवशी सकाळी घराबाहेर ठेवलेला सिलेंडर गायब झाल्याचं लक्षात आल्यानंतर ही घटना उघडकीस आलीये. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.
ही घटना बंगळुरू-मैसूर महामार्गावरील चन्नपट्टणा भागात घडल्याचं म्हटलं जातंय. याठिकाणी स्कूटरवर आलेल्या दोन जणांनी घरात घुसून बाहेर ठेवलेला एलपीजी सिलेंडर चोरल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसतंय. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. घराबाहेर सिलेंडर उघड्यावर ठेवू नये आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावं, असं सांगण्यात आलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.