Viral Video: जवळ गेला, मुलीच्या कपड्यांना हात लावला आणि...! भर रस्त्यात तरूणाने मुलीची काढली छेड; व्हिडीओ व्हायरल

Auto rickshaw harassment video: रिक्षामध्ये बसलेल्या तरुणीची छेडछाड करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून कठोर कारवाईची मागणी होतेय.
Auto rickshaw harassment video
Auto rickshaw harassment videosaam tv
Published On

सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित होताना दिसतो. सरकारच्या हस्तक्षेपानंतरही छेडछाडीच्या घटना थांबत नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. रिक्षामध्ये बसलेल्या तरुणीची छेडछाड करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय.

छेड काढणाऱ्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल

व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुणी रिक्षामध्ये बसलेली दिसतेय. त्याचवेळी एक तरूण मागे बाईकवरून रिक्षाच्या मागे आल्याचं दिसतंय. यावेळी हा तरूण चुकीच्या पद्धतीने बोलताना आणि तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.

हे प्रकरण इतक्यावरच थांबत नाही. यावेळी तो तिच्या कपड्यांना हात लावण्याचा प्रयत्न करत असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसतंय. आसपास लोकांची ये-जा सुरू असतानाही तरूण त्याचं कृत्य थांबवत नाही. दरम्यान हा संपूर्ण प्रकार दूरवर उभ्या असलेल्या एका प्रवाशाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे.

तरुणीने विरोध केल्याचंही कॅमेरात

व्हिडिओमध्ये तरुणी वारंवार विरोध करताना दिसतेय. ती त्याचा हात झटकून दूर होण्याचा प्रयत्न करते. तसंच ती तरूणाला चुकीचं कृत्य थांबवण्याचा इशाराही देते. एका क्षणी ती संताप व्यक्त करत त्याला कानाखाली मारण्याचा इशाराही देतेय. मात्र तो तरूण तिच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत छेडछाड सुरूच ठेवतो.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @WokePandemic या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर तो इंस्टाग्राम आणि फेसबुकसह विविध प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्याचं समोर आलंय.

युजर्सने केल्या विविध कमेंट्स

व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसतायत. अनेक यूजर्सने तरूणाच्या कृत्यावर संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केलीये. 'अशा व्यक्तींना सार्वजनिक शिक्षा मिळाली पाहिजे' असं एका यूजरने म्हटलंय़. तर 'महिलांची सुरक्षा ही केवळ प्रशासनाची नव्हे तर समाजाचीही जबाबदारी आहे' अशी प्रतिक्रिया दुसऱ्या यूजरने दिलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com