Viral Video: ऑटोवाला दिवसाला ७५ हजार कमावतो? त्या व्हायरल व्हिडिओनंतर सर्वांनाच बसला धक्का, पण नेमकं सत्य काय?

Mumbai auto driver income: मुंबईतील एका ऑटो रिक्षा चालकाने दररोज सुमारे 2,500 रुपये कमावतो असा दावा केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या कमाईबाबत व्लॉगरनेव्यक्त करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Mumbai auto driver income
Mumbai auto driver incomesaam tv
Published On

मुंबई सारख्या मेट्रो सिटीमध्ये राहणं किती खर्चिक आहे ते आपल्या प्रत्येकाला माहितीये. खर्च किती महाग आहे यावर चर्चा करत असताना एका व्लॉगरला ऑटो रिक्षा चालकाने दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये हा चालक दररोज सरासरी 2,500 रुपये कमावतो असा दावा करतोय. खर्च वजा केल्यानंतरची ही कमाई असल्याचं त्याने सांगितल्यावर व्लॉगरसह अनेक नेटिझन्स आश्चर्यचकित झाले.

इंस्टाग्रामवर व्हायरल झालेला व्हिडिओ

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर @uvichar_ या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर लगेच व्हायरल झाला आहेत. व्हिडिओमध्ये एक व्लॉगर मुंबई शहरातील महागाईबद्दल ऑटो चालकासोबत संवाद साधताना दिसतो. तो म्हणतो, 'मी आत्ताच चालकासोबत बोलत होतो की, मुंबई शहर खूप महाग आहे.' यावर चालक उत्तर देताना म्हणतो की मुंबईत पैसा कमी नाही, फक्त आपण मेहनत करायला तयार राहिलं पाहिजे.

Mumbai auto driver income
Train viral video: थरारक! ट्रेन पकडण्यासाठी महिलेने जीव धोक्यात घातला, रेल्वे स्टेशनवरील धडकी भरवणारा VIDEO

चालकाशी बोलताना व्लॉगरने त्याला रोजच्या कमाईबद्दल विचारलं असता चालकाने सांगितलं की, तो सरासरी दररोज सुमारे ₹2,500 कमावतो. त्याच्या कमाईतून होणारा खर्च वजा करूनही रिक्षा चालकाकडे इतके पैसे उरतात. हे ऐकून व्लॉगर आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, “भाई, 2,500 रुपये! मी बीटेक करून पहिल्या नोकरीत इतकं कमावत नव्हतो.” पुढे तो साधा हिशोब करून सांगतो की. या कमाईनुसार महिन्याला जवळपास ₹75,000 उत्पन्न होऊ शकतं.

व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये मात्र एक वेगळीच बाब सांगण्यात आलीये. त्यात लिहिलंय की, 'भारतामध्ये 30,000 रुपयांची नोकरी सन्मानाची मानली जाते, पण 75,000 रुपये कमावणाऱ्या रिक्षा चालकाला मात्र तितकं महत्त्व दिलं जात नाही. यशाची ही एक वेगळीच व्याख्या आहे.'

Mumbai auto driver income
Viral Video: धक्कादायक! धावत्या ट्रेनमध्ये विदेशी महिलेसोबत असभ्य वर्तन, बाथरूमपर्यंत पाठलाग अन्....

सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया

हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर 10 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एका युजरने विचारलं, “चालकाकडे काही व्हॅकन्सी आहे का?” तर दुसऱ्याने लिहिलंय, 'आई… मला ऑटोवाली बनायचं आहे!' आणखी एका युजरने प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'मोठ्या शहरांमध्ये ऑटो चालक खरोखरच इतकं कमावतात, कदाचित त्याहून जास्तही.'

Mumbai auto driver income
Mobile phone explosion: गेम खेळताना हातात मोबाइलचा स्फोट, चिमुकलीला गंभीर दुखापत; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com