Shruti Vilas Kadam
सिद्धरामय्या यांनी कर्नाटक राज्याच्या बजेट भाषणात १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा प्रस्ताव जाहीर केला. हा निर्णय मुलांच्या वाढत्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या प्रस्तावानुसार १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. मुलांवर होणाऱ्या नकारात्मक परिणामांमुळे हा निर्णय घेतल्याचे सरकारने स्पष्ट केले.
सरकारने सांगितले की, मुलांमध्ये मोबाईल आणि सोशल मीडियाचा वाढता वापर त्यांच्या अभ्यासावर, वर्तनावर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करत आहे. त्यामुळे यावर नियंत्रण आवश्यक आले.
काही तज्ज्ञांच्या मते, मुलांमध्ये सोशल मीडिया आणि स्क्रीन टाइमचे व्यसन वाढत आहे. हा धोका कमी करण्यासाठी राज्य सरकारने कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
हा प्रस्ताव लागू झाल्यास कर्नाटक हे भारतातील १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारे पहिले राज्य ठरू शकते.
या निर्णयापूर्वी सरकारने विद्यापीठांचे कुलगुरू आणि तज्ज्ञांशी चर्चा केली. या बंदीची अंमलबजावणी कशी करायची यावर सरकार विचार करत आहे.
सरकारच्या मते, सोशल मीडियामुळे मुलांना हानिकारक कंटेंट, सायबर धोके आणि चुकीच्या सवयींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे.