Shruti Vilas Kadam
उन्हाळ्यात मेकअप लावण्यापूर्वी चेहरा चांगला क्लेन्सरने स्वच्छ करा आणि हलका मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि मेकअप जास्त वेळ टिकतो.
मेकअप लावण्याआधी प्रायमर लावल्याने त्वचेवर एक स्मूथ बेस तयार होतो. त्यामुळे फाउंडेशन नीट बसते आणि घामामुळे मेकअप लवकर खराब होत नाही.
उन्हाळ्यात जड फाउंडेशन टाळावे. हलके आणि मॅट फिनिश असलेले फाउंडेशन वापरल्यास त्वचा तेलकट दिसत नाही आणि मेकअप जास्त वेळ टिकतो.
मेकअप सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर वापरा. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रणात राहते आणि मेकअप खराब होत नाही.
उन्हाळ्यात घाम जास्त येतो, त्यामुळे वॉटरप्रूफ आयलाइनर, मस्कारा आणि काजळ वापरणे चांगले. यामुळे मेकअप पसरत नाही.
मेकअप पूर्ण झाल्यानंतर सेटिंग स्प्रे वापरल्यास तो जास्त वेळ टिकतो. तसेच चेहरा फ्रेश आणि नैसर्गिक दिसतो.
दिवसभरात त्वचेवर तेलकटपणा वाढल्यास ब्लॉटिंग पेपरने हलकेच दाबा. यामुळे मेकअप न खराब करता चेहरा फ्रेश दिसतो