Shocking : भयंकर घटना! इंटरव्ह्यूला बोलावून तरूणीला जिवंत जाळलं, पीडिता आणि आरोपीमध्ये नेमकं काय घडलं?

Kolkata Crime News : कोलकात्यात नोकरीच्या आमिषाने बोलावलेल्या तरुणीला जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
Shocking : भयंकर घटना! इंटरव्ह्यूला बोलावून तरूणीला जिवंत जाळलं, पीडिता आणि आरोपीमध्ये नेमकं काय घडलं?
Kolkata Crime News Saam tv
Published On
Summary
  • कोलकात्यात तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना

  • नोकरीच्या आमिषातून बोलावल्याचा आरोप

  • आरोपीला अटक

  • पोलिस तपास सुरू

  • महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण

Kolkata Women Burned Alive Over One Side Love कोलकाताच्या मैदान परिसरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नोकरीचे आमिष दाखवत एका तरुणीला इंटरव्ह्यूसाठी बोलावून तिला जिवंत जाळलं असल्याची घटना घडली आहे. पीडितेला आरोपीने लग्नासाठी जबरदस्ती केली. मात्र तरुणीने त्याला नकार दर्शवल्याने हा प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याची सखोल चौकशी सुरूर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ३ एप्रिल २०२६ रोजी, दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास, कोलकाता येथील मैदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मृत तरुणी प्रियांका (बदलेलं नाव) हीला नोकरीची गरज होती. आरोपी सिद्धार्थ चारिवालने पीडितेला फोन करून नोकरी देतो सांगून मुलाखतीसाठी बोलावलं. नोकरीच्या आशेने गेलेल्या प्रियांकासोबत मात्र भलतचं घडलं.

Shocking : भयंकर घटना! इंटरव्ह्यूला बोलावून तरूणीला जिवंत जाळलं, पीडिता आणि आरोपीमध्ये नेमकं काय घडलं?
Shocking : महाराष्ट्र हादरला! नाशिकनंतर आणखी एका भोंदू बाबाचे भयंकर कृत्य; महिलेच्या गुप्तांगातील द्रव काढले अन्...

सिद्धार्थने तरुणीला लग्नासाठी मागणी घातली. मात्र दोघेही वेगवेगळ्या समाजाचे असल्याने प्रियंकाने त्याला नकार दिला. नकार पचवू न शकणाऱ्या सिद्धार्थने रागाच्या भरात तरुणीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळलं आणि घटनास्थळावरुन पळ काढला. या दुर्घटनेत प्रियंकाच पूर्ण शरीर जळालं आणि ती बेशुद्ध पडली.

Shocking : भयंकर घटना! इंटरव्ह्यूला बोलावून तरूणीला जिवंत जाळलं, पीडिता आणि आरोपीमध्ये नेमकं काय घडलं?
Crime News : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार; सोशल मीडियावर मैत्री करणं पडली महागात

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरु असतानाच प्रियंकाचा मृत्यू झाला.याप्रकरणी प्रियंकाच्या आईने पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी काही तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी आता पोलीस सखोल तपास करत आहेत. दरम्यान या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com