Shocking : महाराष्ट्र हादरला! नाशिकनंतर आणखी एका भोंदू बाबाचे भयंकर कृत्य; महिलेच्या गुप्तांगातील द्रव काढले अन्...

Raigad Fake Godman Babajan News : रायगडमध्ये भोंदू बाबाने अघोरी पूजेच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
Shocking : महाराष्ट्र हादरला! नाशिकनंतर आणखी एका भोंदू बाबाचे भयंकर कृत्य; महिलेच्या गुप्तांगातील द्रव काढले अन्...
Raigad Fake Godman Babajan NewsSaam tv
Published On
Summary
  • रायगडमध्ये भोंदू बाबाने महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप

  • ‘उपाय’ आणि अघोरी पूजेच्या नावाखाली गुन्हा घडल्याचे समोर

  • खालापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

  • आरोपी अटकेत

सचिन कदम, रायगड

Mumbai Women Rape By Fake Godman Babajan Over Puja Ritual महाराष्ट्रातील नाशिकमधील भोंदू कॅप्टन खरात प्रकरण ताजे असताना आता रायगडमध्ये एका भोंदू बाबाने एका महिलेवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. नवऱ्याच्या बाहेरील प्रेमप्रकरणाला कंटाळून उपाय मागण्यासाठी ही महिला या बाबाकडे गेली असता अनुचित प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पिडीत महिलेने खालापुर पोलिस ठाण्यात या भोंदू बाबा विरोधात तक्रार दाखल केली आहे. देव देवतांच्या नावाखाली चालणाऱ्या या प्रकरणामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल रशीद उर्फ बाबाजान या भोंदू बाबाचे नाव आहे. भोंदू बाबाजान हा नवीमुंबई येथील कळंबोलीमध्य रहिवाशी आहे. तर पीडित महिला सांताक्रूझ मुंबई येथील रहिवाशी आहे. तसेच सदर प्रकरण रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महड येथील निर्जन ठिकाणी असलेल्या एका फार्म हाऊसवर घडली आहे.

Shocking : महाराष्ट्र हादरला! नाशिकनंतर आणखी एका भोंदू बाबाचे भयंकर कृत्य; महिलेच्या गुप्तांगातील द्रव काढले अन्...
Political News : शरद पवार गटाला मोठा धक्का! बड्या नेत्याने धरली भाजपची वाट; पक्षप्रवेशाचा मुर्हूतही ठरला

पिडीत महिला पतीच्या प्रेयसी बाबत उपाय करण्यासाठी भोंदूबाबाकडे गेली होती. या वेळी उपाय करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाजानने मध्यरात्रीच्या वेळी अघोरी पुजाविधी करण्यासाठी महिलेला खालापूर तालुक्यातील महड येथील निर्जन ठिकाणी असलेल्या एका फार्म हाऊसवर बोलावलं.

Shocking : महाराष्ट्र हादरला! नाशिकनंतर आणखी एका भोंदू बाबाचे भयंकर कृत्य; महिलेच्या गुप्तांगातील द्रव काढले अन्...
Political News : माजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर राघव चड्डा यांना मारहाण; बड्या नेत्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ

मध्यरात्रीच्या वेळी ही अघोरी पूजा करताना आरोपीने महिलेच्या गुप्तांगातील द्रव काढून तो दोऱ्याला लावून तो दोरा जाळला. यावेळी सदर भोंदू बाबाने महिलेच्या शरिराला स्पर्ष केला तसेच शारिरीक संबंध करीत लैंगिक अत्याचार केला असल्याचे महिलेने म्हटले आहे. याप्रकरणी खालापुर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. महिलेच्या तक्रारीवरून या भोंदू बबजानला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु असून या अशा अघोरी प्रकरणांना बळी न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com