Political News : माजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर राघव चड्डा यांना मारहाण; बड्या नेत्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ

Raghav Chadha News : नवीन जयहिंद यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे राघव चड्ढा यांच्यावर झालेल्या कथित मारहाणीचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
Political News : माजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर राघव चड्डा यांना मारहाण; बड्या नेत्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
Raghav Chadha NewsSaam Tv
Published On
Summary
  • नवीन जयहिंद यांनी व्हिडिओद्वारे गंभीर आरोप केले

  • राघव चड्ढा यांना मारहाण

  • प्रकरणामुळे राजकीय वाद वाढला

  • चड्ढा यांची अद्याप प्रतिक्रिया नाही

हरियाणाचे माजी आप प्रदेशाध्यक्ष नवीन जयहिंद यांनी त्यांच्या पूर्वीच्या अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करून खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या शीशमहालमध्ये राघव चड्ढा यांना कोंबड्याच्या स्थितीमध्ये उभं करून मारहाण करण्यात आली. या मारहाणीत चड्ढा यांच्या डोळ्याला दुखापत झाली, ज्यावर त्यांनी नंतर इंग्लंडमध्ये उपचार घेतले असल्याचं नवीन यांनी म्हटलं.

आप प्रदेशाध्यक्ष नवीन जयहिंद यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर दोन मिनिटांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी असा आरोप केला आहे की, राघव चड्ढा यांना शीशमहालमध्ये बोलावून मारहाण करण्यात आली. त्यावेळी चार वरिष्ठ नेते देखील तिथे उपस्थित होते, परंतु राघव यांनी अद्याप या घटनेबद्दल खुलासा केलेला नाही.

Political News : माजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर राघव चड्डा यांना मारहाण; बड्या नेत्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
Shocking : केबिनचा दरवाजा लावला,कपडे काढायला सांगितले अन्... उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत डॉक्टरचे अश्लील कृत्य

या घटनेत त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली होती, ज्यावर नंतर इंग्लंडमध्ये उपचार करण्यात आले. नवीन यांनी असेही म्हटले आहे की, डोळ्याला दुखापत झाली तेव्हा राघव इंग्लंडला गेले होते, परंतु लोकांनी असा समज करून घेतला की ते हनिमूनवर गेले आहेत. आता त्यांनी याचा सर्व जनतेसमोर खुलासा केला पाहिजे असे नवीन यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

नवीन जयहिंद कोण आहेत?

नवीन जयहिंद २०११ साली अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सामील झाले होते. ते आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य होते. अंतर्गत मतभेदांमुळे त्यांनी २०२२ मध्ये 'आप'मधून राजीनामा दिला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com