Shocking: लग्नाच्या हॉलमध्ये 'गंदाकाम', ४१ खोल्यांमध्ये ८० तरुण अन् तरुणींना नको त्या अवस्थेत पकडलं; पोलिसांनी छापा टाकताच...

Bihar Crime: बिहारमध्ये पोलिसांनी एका लग्नाच्या हॉलवर छापा टाकत मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या हॉलमधील ४१ खोल्यांमध्ये ८० तरुण -तरुणींना पोलिसांनी नको त्या अवस्थेत पकडलं. या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
Shocking: लग्नाच्या हॉलमध्ये 'गंदाकाम', ४१ खोल्यांमध्ये ८० तरुण अन् तरुणींना नको त्या अवस्थेत पकडलं; पोलिसांनी छापा टाकताच...
Bihar Crime Saam Tv
Published On

Summary -

  • बिहारच्या रोहतासमध्ये लग्नाच्या हॉलवर पोलिसांचा छापा

  • ४१ खोल्यांमध्ये ८० तरुण-तरुणी आक्षेपार्ह स्थितीत आढळले

  • ३१ जण अल्पवयीन असल्याची माहिती समोर

  • पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला

बिहारच्या रोहतासमध्ये पोलिसांनी एका लग्नाच्या हॉलवर छापा टाकत मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. याठिकाणी ४१ खोल्यांमध्ये ८० तरुण आणि तरुणींना पोलिसांनी नको त्या अवस्थेत पकडलं. हॉलच्या आतमधील चित्र पाहून पोलिसही चक्रावले. याप्रकरणी पोलिसांनी ३९ तरुण आणि ४१ तरुणींविरोधात गुन्हा दाखल केला. यामध्ये ३१ मुलं अल्पवयीन असून त्यामध्ये १८ मुली आणि १३ मुलांचा समावेश आहे. या घनटेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस सध्या या मुलं आणि मुलांची चौकशी करत आहेत.

विक्रमगंज एसडीएम प्रभात कुमार यांना गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मलियाबाग येथे असणाऱ्या एका लग्नाच्या हॉलवर छापा टाकला. या हॉलमध्ये ४१ खोल्या होत्या. या खोल्यामध्ये ८० तरुण आणि तरुणी आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले. हे सर्वजण एका सेक्स रॅकेटचा भाग असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील अनेक मुलं आणि मुली अल्पवयीन असून काही जण कॉलेज आणि शाळेचे विद्यार्थी आहेत.

Shocking: लग्नाच्या हॉलमध्ये 'गंदाकाम', ४१ खोल्यांमध्ये ८० तरुण अन् तरुणींना नको त्या अवस्थेत पकडलं; पोलिसांनी छापा टाकताच...
Shocking : "आई तू दिलेल्या जीवनाचे..." संभाजीनगरमध्ये २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

१८ अल्पवयीन मुली आणि १३ अल्पवयीन मुलांना याठिकाणी कुणी आणले? ते या सेक्स रॅकेटमध्ये कसे आले त्यांच्याकडून कुणी जबरदस्ती हे काम करून घेत होते का? याचा तपास पोलिस करत आहेत. एका खोलीमध्ये १ तासासाठी ८०० रुपये घेतले जात होते अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या लग्नाच्या हॉलवर अचानक छापा टाकल्याने एकच खळबळ उडाली. त्याठिकाणी असणारे सर्वजण इकडे तिकडे पळू लागले. पोलिसांनी सर्व मुलं आणि मुलींना ताब्यात घेत त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे.

Shocking: लग्नाच्या हॉलमध्ये 'गंदाकाम', ४१ खोल्यांमध्ये ८० तरुण अन् तरुणींना नको त्या अवस्थेत पकडलं; पोलिसांनी छापा टाकताच...
Shocking : केबिनचा दरवाजा लावला,कपडे काढायला सांगितले अन्... उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत डॉक्टरचे अश्लील कृत्य

एसडीपीओ सिंधू शेखर सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. अटक करण्यात आलेले बहुतेक मुलं आणि मुली जवळच्या ग्रामीण भागातील असून त्यांच्यापैकी बरेच जण शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. या प्रकरणातील अल्पवयीन मुलींना वैद्यकीय तपासणीनंतर बाल कल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे. कोणतेही संभाव्य नेटवर्क किंवा इतर बेकायदेशीर कारवाया उघडकीस आणण्यासाठी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.

Shocking: लग्नाच्या हॉलमध्ये 'गंदाकाम', ४१ खोल्यांमध्ये ८० तरुण अन् तरुणींना नको त्या अवस्थेत पकडलं; पोलिसांनी छापा टाकताच...
Shocking : महाराष्ट्र हादरला! नाशिकनंतर आणखी एका भोंदू बाबाचे भयंकर कृत्य; महिलेच्या गुप्तांगातील द्रव काढले अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com