Latur Police: लाच घेताना पोलिस निरीक्षकाला अटक, ACB ची मोठी कारवाई; पोलिस दलात खळबळ

Latur police inspector caught taking bribe: लातूरमध्ये एसीबीने मोठी कारवाई केली. पोलिस निरीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे लातूर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
Latur Police: लातूरमध्ये ACBची मोठी कारवाई, पोलिस निरीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं
Latur police inspector caught taking bribeSaam Tv
Published On

Summary -

  • लातूरमध्ये एसीबीची मोठी कारवाई

  • पोलिस निरीक्षकाला ४५ हजारांची लाच घेताना अटक

  • ३ लाखांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप

  • पोलिस विभागात खळबळ

लातूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंध विभागाने मोठी कारवाई केली. पोलिस निरीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं. पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी ४५ हजारांची लाच घेत होते. एसीबीने सापळा रचत त्यांच्याविरोधात ही कारवाई केली. या घटनेमुळे लातूरच्या पोलिस दलामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याचे लाचखोर पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी यांना लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले. आरोपीला दाखल गुन्ह्याच्या तपासात अटक न करण्यासाठी तब्बल ३ लाखांच्या लाचेची मागणी या पोलिस निरीक्षकाने त्यांच्या पोलिस कर्मचाऱ्यामार्फत केली होती.

Latur Police: लातूरमध्ये ACBची मोठी कारवाई, पोलिस निरीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं
Crime News: बायको अश्लील व्हिडीओ पाठवतेय आणि..., पत्नीच्या विचित्र मागणीमुळे नवरा हैराण, थेट पोलीस ठाण्यात पोहचला

लाचलुचपत प्रतिबंध विभागाने केलेल्या या कारवाईत पोलिस हेडकॉन्स्टेबल राहुल नागरगोजे आणि पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांना ४५ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. राजकुमार पुजारी यांच्या घराची सध्या एसीबीच्या पथकाकडून झाडाझडी सुरू आहे. एसीबीकडून राजकुमार पुजारी आणि राहुल नागरगोजे या दोघांची चौकशी सुरू आहे.

Latur Police: लातूरमध्ये ACBची मोठी कारवाई, पोलिस निरीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं
Crime: पुजाऱ्याकडून ५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, डोंबिवली हादरली

दरम्यान, नाशिक जिल्हा परिषद बांधकाम विभागात एसीबीची मोठी कारवाई केली होती. चांदवड उपविभागीय अभियंता विठ्ठल पठाडे यांना ३ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. तर शाखा अभियंता कृष्णकांत देवरे फरार असून त्याचा शोध सुरू आहे. नाशिकच्या भद्रकाली पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. रस्ता डांबरीकरणाच्या कामाच्या बिलासाठी एका कंत्राटदारकडून त्यांनी लाचेची मागणी केली. एकूण ५ लाख ६७ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार आहे. तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

Latur Police: लातूरमध्ये ACBची मोठी कारवाई, पोलिस निरीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं
Akola Crime: महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या आरोपी पोलिसाचा थाट, मिळतेय VIP ट्रिटमेंट; राजेश जाधवचा नवा VIDEO समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com