Crime: पुजाऱ्याकडून ५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, डोंबिवली हादरली

Dombivli Crime: डोंबिवलीमध्ये ५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. शेजारी राहणाऱ्या पुजाऱ्याने हे भयंकर कृत्य केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
Crime: पुजाऱ्याकडून ५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, डोंबिवली हादरली
Dombivli CrimeSaam Tv
Published On

Summary -

  • डोंबिवलीत ५ वर्षांच्या मुलीवर पुजाऱ्याने लैंगिक अत्याचार केला

  • शेजारी असल्याचा फायदा घेत आरोपीने केले भयंकर कृत्य

  • पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली

  • घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली

डोंबिवलीमध्ये ५ वर्षांच्या चिमुकलीवर पुजाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. घरामध्ये कुणी नसल्याचा फायदा घेत शेजारी राहणाऱ्या पुजाऱ्याने या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे. डोंबिवलीच्या टिळकनगर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी पुजाऱ्याला अटक केली. या घटनेमुळे डोंबिवलीत संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरीश भावे असे आरोपीचे नाव आहे. तो घरोघरी जाऊन पूजा-अर्चा करणारा पुजारी आहे. हरीशने ५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी आरोपीच्या शेजारीच राहते. पीडित मुलीच्या घरामध्ये आरोपीचे येणे जाणे होते. याच ओळखीचा गैरफायदा त्याने घेतला. पीडित मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले असताना आरोपीने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला.

Crime: पुजाऱ्याकडून ५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, डोंबिवली हादरली
Crime: सावत्र बाप करायचा लैंगिक अत्याचार; वैतागून घर सोडून पळालेल्या मुलीवर दोघांकडून सामूहिक बलात्कार

पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर ही संतापजनक घटना उघडकीस आली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या पीडित मुलीच्या पालकांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेचे गांभिर्य लक्षात घेता आरोपीविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडित मुलीच्या पालकांनी केली.

Crime: पुजाऱ्याकडून ५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, डोंबिवली हादरली
Crime News: बायको अश्लील व्हिडीओ पाठवतेय आणि..., पत्नीच्या विचित्र मागणीमुळे नवरा हैराण, थेट पोलीस ठाण्यात पोहचला

काही दिवसांपूर्वी घडलेल्या अन्य गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर ही घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. डोंबिवलीत नेमकं चाललंय काय? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे धार्मिक कार्य करणाऱ्या व्यक्तीकडूनच असा प्रकार घडल्याने समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Crime: पुजाऱ्याकडून ५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, डोंबिवली हादरली
Pune Crime: दुहेरी हत्याकांडाने आळंदी हादरली, वृद्ध महिलेसह ६ वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com