Pune Crime: दुहेरी हत्याकांडाने आळंदी हादरली, वृद्ध महिलेसह ६ वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या

Double Murder in Alandi: देवाची आळंदीमध्ये दोन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. रात्री घरामध्ये झोपलेल्या आजी आणि ६ वर्षांच्या नातीवर धारदार शस्त्राने वार करत संपवण्यात आले. या घटनेमुळे पुणे हादरले आहे.
Pune Crime: दुहेरी हत्याकांडाने आळंदी हादरली, वृद्ध महिलेसह ६ वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या
Pune CrimeSaam Tv
Published On

Summary -

  • आळंदीमध्ये दुहेरी हत्याकांड

  • वृद्ध महिला आणि ६ वर्षांच्या नातीची हत्या

  • अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने केला हल्ला

  • पोलिसांकडून तपास सुरू

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पुण्यातील आळंदीमध्ये दोन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. या दुहेरी हत्याकांडाने आळंदी हादरली आहे. आळंदीच्या ठाकर वस्ती परिसरात एक वृद्ध महिलेची आणि सहा वर्षाच्या चिमुकलीची निघृणपणे हत्या करण्यात आली. अज्ञात व्यक्तीने दोघांचीही धारदार शस्त्राने वार करत हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. दोघांचे मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील देवाची आळंदीमध्ये आज सकाळी या दुहेरी हत्याकांडाची घटना घडली. अज्ञात व्यक्तीने ठाकर वस्तीतील एका घरात रात्री घुसून मंगला चंद्रकांत शिंदे (७० वर्षे) या वृद्ध महिलेची आणि धनश्री केदारे (६ वर्षे) या चिमुकल्या मुलीवर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात दोघीही गंभीर जखमी झाल्या होत्या. जास्त रक्तस्राव झाल्यामुळे दोघींचा जागीच मृत्यू झाला. धनश्री केदारे या चिमुकल्या मुलीची आजी हाउसकीपिंगच्या कामासाठी नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री एका खासगी हॉस्पिटलमध्ये गेली होती. त्याचवेळी घरात घुसून एका व्यक्तीने दोघांवर हल्ला करत त्यांची हत्या केली.

Pune Crime: दुहेरी हत्याकांडाने आळंदी हादरली, वृद्ध महिलेसह ६ वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या
Crime: सावत्र बाप करायचा लैंगिक अत्याचार; वैतागून घर सोडून पळालेल्या मुलीवर दोघांकडून सामूहिक बलात्कार

पोलिसांनी सांगितले की, संगीता केदारे (४७ वर्षे) ही महिला आपल्या ६ वर्षांची नात धनश्रीला घराशेजारी राहणाऱ्या मंगला चंद्रकांत शिंदे या महिलेच्या ताब्यात सोपवून रोज हाउसकीपिंगच्या कामासाठी एका खासगी रुग्णालयात जात होत्या. नेहमीप्रमाणे संगीता केदारी बुधवारी रात्री कामावर गेल्या. त्यांची नात धनश्री आणि मंगला शिंदे या घरामध्ये झोपल्या होत्या. मात्र रात्री उशिरा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात प्रवेश केला. त्याने धारदार शस्त्राने धनश्री केदारे आणि मंगला शिंदे या दोघींची हत्या केली.

Pune Crime: दुहेरी हत्याकांडाने आळंदी हादरली, वृद्ध महिलेसह ६ वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या
Cyber Crime: एक क्लिक आणि खाते रिकामे! मुंबईतील न्यायमूर्तींना एपीके फाईल पाठवून गंडवलं, नेमकं घडलं काय?

या प्रकरणी धनश्रीची आजी संगीता केदारे यांनी आळंदी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली असून सध्या आळंदी पोलिस या दोन्ही हत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे काम करत आहेत. तसेच आरोपींनी आजी आणि चिमुकल्या मुलीची हत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झालं नाही. या घटनेचे गांभीर्य पाहून पिंपरी चिंचवड शहर पोलिस दलातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीच्या शोध घेण्यासाठी काही विशेष पोलिस पथक तयार केले आहे.

Pune Crime: दुहेरी हत्याकांडाने आळंदी हादरली, वृद्ध महिलेसह ६ वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या
Crime News: बायको अश्लील व्हिडीओ पाठवतेय आणि..., पत्नीच्या विचित्र मागणीमुळे नवरा हैराण, थेट पोलीस ठाण्यात पोहचला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com