पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Pune crime news : पुण्यातील रीलस्टार वादात सापडला आहे. महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
pune crime
santosh pandit Saam tv
Published On
Summary

रीलस्टार संतोष पंडितवर विनयभंगाचा गुन्हा

पुणे पोलिसांकडून रीलस्टारवर कारवाई

पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुण्यातील रीलस्टार संतोष पंडितवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याप्रकरणी संतोष पंडितवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मानवतेच्या आणि ज्ञान पाजळणाऱ्या रील्स तयार करून समाज प्रबोधन करणाऱ्या पंडितवर पुणे पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात विनयभंगासह महिला पत्रकाराची सहमती नसताना व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यात झालेल्या "गुलाबो गँग"च्या आंदोलनावेळी संतोष पंडितकडून महिला पत्रकाराशी असभ्य वर्तवणूक करण्यात आली. या प्रकरणी महिला पत्रकाराने पोलिसांत तक्रार दिली आहे.

pune crime
Shocking : गिऱ्हाइक आला की मुली दाखवायचा, पसंत आली की...कला केंद्राच्या नावाखाली सुरू होता वेश्याव्यवसाय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडितकडून हा सगळा प्रकार ३० मार्च रोजी पुण्यातील ग्राहक पेठेसमोर घडला. सामाजिक कार्यकर्त्या संगिता तिवारी या नाशिक येथील अशोक खरात प्रकरणाच्या विरोधात सोमवारी सकाळी आंदोलन करत होत्या. यावेळी तक्रारदार पत्रकार या नात्याने आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी उपस्थित होत्या.यावेळी संतोष पंडित त्याठिकाणी आला.

'तुमच्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे,' असे म्हणून पत्रकारांविषयी अर्वाच्च भाषा वापरुन शिवीगाळ केली. तसेच महिला पत्रकाराच्या अंगावरील कपड्यांवरुन अश्लील शेरेबाजी केली. तसंच त्याने त्याच्या फोनमध्ये व्हिडिओ कैद केला. आंदोलनकर्त्या महिलांचे अंगावर धावून जाऊन शिवीगाळ आणि दमदाटी केली.

pune crime
ड्रग्स-वेश्या व्यवसायाची भीती दाखवली; मुंबईतल्या विवाहित महिलेला बोगस पोलिसांनी गंडवलं

या प्रकरणी पंडितवर पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७५, ७८, ३५२, ३५१ (२) आणि २९६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून संतोष पंडित याच्या विरोधात इतर लोकांच्या काही तक्रारी असल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन सुद्धा पोलिसांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com