Akola Crime: महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या आरोपी पोलिसाचा थाट, मिळतेय VIP ट्रिटमेंट; राजेश जाधवचा नवा VIDEO समोर

Akola Accused Police VIP Treatment: अकोल्यामध्ये अटकेत असलेल्या पोलिस अधिकाऱ्याला व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे. या पोलिस अधिकाऱ्याने आरोपी महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली होती.
Akola Crime: महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या आरोपी पोलिसाचा थाट, मिळतेय VIP ट्रिटमेंट; राजेश जाधवचा नवा VIDEO समोर
Akola CrimeSaam Tv
Published On

Summary -

  • अकोल्यात पोलिस अधिकाऱ्यावर महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप

  • आरोपी राजेश जाधवला अटक आणि निलंबनाची कारवाई

  • व्हायरल व्हिडिओमुळे ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’चा आरोप

अक्षय गवळी, अकोला

भोंदू अशोक खरात प्रकरणात पीडित महिलांना न्याय मिळावा यासाठी पोलिसांकडून वेगाने तपास सुरु आहे. 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे, मात्र याचा विसर अकोला पोलिसांना पडलाय. अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात कार्यकत असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने पोलिस कोठडीतील महिला कैद्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप झाला. या प्रकरणात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून निलंबन करण्यात आलं. आज संबंधित पोलिस अधिकारी राजेश जाधवला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. पण या आरोपी पोलिस अधिकाऱ्याचा वेगळाच थाट पाहायला मिळाला.

राजेश जाधवची कारागृहात रवानगी होण्यापूर्वीचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये राजेश जाधवला सिव्हिल लाईन पोलिसांकडून 'व्हीआयपी ट्रीटमेंट' मिळत असल्याचा आरोप होत आहे. आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास राजेश जाधवला पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. या ठिकाणी न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. त्यानंतर साडेतीन वाजता अकोला जिल्हा कारागृह या ठिकाणी जाधवला पोलिस गाडीत आणण्यात आलं.

Akola Crime: महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या आरोपी पोलिसाचा थाट, मिळतेय VIP ट्रिटमेंट; राजेश जाधवचा नवा VIDEO समोर
Cyber Crime: एक क्लिक आणि खाते रिकामे! मुंबईतील न्यायमूर्तींना एपीके फाईल पाठवून गंडवलं, नेमकं घडलं काय?

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जाधव पोलिसांच्या गाडीतून खाली उतरल्यानंतर बिंदास बाहेर वावरताना दिसतो. पोलिसांच्या गाडीतून उतरतानाना त्याच्या हातात पाण्याची बॉटल दिसत आहे. त्याठिकाणी उपस्थित पोलिसांशी तो बिनधास्त गप्पा मारतो आणि एका पोलिसाच्या हातातून मोबाईल घेऊन बोलताना दिसतो. अशात त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट म्हणून बोलण्यासाठी फोन उपलब्ध करून देण्यात आलाय का?, असा प्रश्न विचारला या निमित्ताने उपस्थित होत आहे. कारण समोर आलेले व्हिडिओ हे चक्क अकोला जिल्हा कारागृहासमोरीलच आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी त्याला कुणीही येऊन भेटत होतं. मात्र उभे असलेल्या एकाही पोलिसांनी या सर्व गोष्टीला हटकलं सुद्धा नाही. त्यामुळे आरोपी हा पोलिस असल्यामुळेच व्हीआयपी ट्रीटमेंट मिळतो का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Akola Crime: महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या आरोपी पोलिसाचा थाट, मिळतेय VIP ट्रिटमेंट; राजेश जाधवचा नवा VIDEO समोर
Pune Crime: दुहेरी हत्याकांडाने आळंदी हादरली, वृद्ध महिलेसह ६ वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या

नेमकं प्रकरण काय?

अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्येचं पोलिस अधिकारी राजेश जाधवने अटकेतील महिलेकडं शरीर सुखाची मागणी केली होती. ३१ मार्च रोजी हे प्रकरण घडलं होतं. याच दिवशी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारासचा हा प्रकार घडला. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेश जाधवने अटकेतील महिलेला तुझ्या मुलीचं वय किती? १० हजार रुपये देतो रात्रभर मुलीला माझ्याकडे पाठव, अशी मागणी केल्याचा आरोप महिलेने केला होता. या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटले होते. कारण, त्याचा एक व्हिडिओ वायरल झाला होता, यात वरिष्ठांनी या 'एएसआय'च्या कानशिलात मारण्याचा प्रयत्न केला होता.

Akola Crime: महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या आरोपी पोलिसाचा थाट, मिळतेय VIP ट्रिटमेंट; राजेश जाधवचा नवा VIDEO समोर
Shocking : खाकीला काळिमा! गुन्हा दाखल करायला आलेल्या बलात्कार पीडितेकडे शरीरसुखाची मागणी; पोलीस दलात खळबळ

'वर्दी घातलीस ना तू, लाज कशी वाटली नाही...' अशा कडक शब्दात त्याला सुनावलं होतं. हे प्रकरण माध्यमांमध्ये चांगलंच गाजलं. त्याच्याविरोधात संबंधित पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर राजेश जाधवला पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आले. काल रात्री जठारपेठ भागातून त्याला अटक झाली. पुढं त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. त्यानंतर अटकेतील महिलेसमोर जाधवची ओळखपरेड झाली. तहसीलदारांच्या उपस्थित कारागृहातच ही ओळखपरेड झाली असल्याची माहिती मिळत आहे.

Akola Crime: महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या आरोपी पोलिसाचा थाट, मिळतेय VIP ट्रिटमेंट; राजेश जाधवचा नवा VIDEO समोर
Akola : रुग्णाकडून डॉक्टरवर जीवघेणा हल्ला, सलाईनचे स्टँड डोक्यात घातले; नेमकं कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com