लातूरमध्ये ५० हून अधिक भोंदू-बुवांची यादी समोर
अंनिसकडून कडक कारवाईची मागणी
जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीवर भर
अंधश्रद्धा आणि फसवणुकीमुळे समाजात चिंता
संदीप भोसले, लातूर
महाराष्ट्रात अलीकडे उघडकीस येत असलेल्या काही बाबा-बुवांच्या प्रकरणांमुळे समाजात मोठी भीती निर्माण झालेली आहे. दैवी शक्ती, चमत्कार, भविष्य, ज्योतिष किंवा अध्यात्माच्या नावाखाली देव आणि धर्माच्या अडून अनेक ठिकाणी लोकांची आर्थिक फसवणूक, मानसिक छळ तसेच महिलांचे लैंगिक शोषण होण्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच लातूर जिल्ह्यातील पन्नासहुन अधिक भोंदू-बुवा, बाबा, मांत्रिक यांची यादी समोर आली आहे.
लातूर जिल्ह्यातील पन्नास हुन अधिक भोंदू-बुवा, बाबा, मांत्रिक यांची यादी महा.अंनिस, जिल्हा शाखेच्या वतीने अगोदरच आपल्या कार्यालयात दिलेली आहे. त्यानंतर जे बुवा- बाबा तयार झाले, त्याचाही शोध घ्यावा व त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असेही निवेदनात मागणी करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी व अतिरिक्त दंडाधिकारी माननीय नेटके साहेब व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
पोलीस महासंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार, प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन कारण्याचे निर्देश दिले, त्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात तसा स्वतंत्र कक्ष स्थापन करून तसे जाहीर करावे आणि ते प्रत्यक्ष कृतिशील राहतील हॆ पाहावे. तसेच संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना या कायद्यासंदर्भात प्रशिक्षण द्यावे. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेने अधोरेखित केलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मूल्यांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालय व समाज पातळीवर जनजागृती कार्यक्रम राबविण्यात यावेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.