लग्नाच्या वरातीत जमिनीवरून सपासप वार, काका आणि भावाची हत्या, वर्धा हादरले

Maharashtra Crime News : वर्ध्यातील लग्नाच्या वरातीत संपत्तीच्या वादातून अल्पवयीन पुतण्याने काका आणि चुलत भावावर चाकू हल्ला करत दोघांची हत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
Crime
Crime Saam tv
Published On

चेतन व्यास, वर्धा प्रतिनिधी

नवरदेव बोहल्यावर चढला, सगळीकडे आनंदाचे वातावरण, बँडमध्ये सर्व वर्‍हाडी नाचत असताना वर्ध्यात एक भयंकर घटना घडली आहे. हनुमान मंदिरात दर्शन घेऊन वरात जात होती, त्याचवेळी संपतीच्या वादातून पुतण्याने काका आणी चुलत भावावर चाकूहल्ला केलाय. यात काका आणी चुलत भावाचा मृत्यू झालाय. आरोपी पुतण्या हा अल्पवयीन असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना वर्धेच्या महिला आश्रम समोरील हनुमान मंदिराजवळ घडली. प्रभाकर भलमे आणी नितीन भलमे अशी मृतकांची नाव आहे.

बरबडी येथील भलमे कुटुंबियांचे संपत्तीच्या वादातून आपसात खटके उडत होते. आठ महिन्यापूर्वी सुद्धा अल्पवयीन आरोपी आणी मृतकांमध्ये वाद झाला होता. आरोपी हा यांना मारण्याच्या अनेक दिवसांपासून बेतात होता. त्याने मारण्यासाठी ऑनलाईन चाकू सुद्धा मागवला होता. शनिवारी रात्री नातेवाईकाचे वर्धेत लग्न होते. या लग्नात त्याने काका आणी चुलत भावाला मारण्याचा कट रचला. वरात वाजत गाजत हनुमान मंदिरात पोहचताच पुतण्याने काका आणी भावावर चाकू हल्ला करत जखमी केले. दोघांना तातडीने सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Crime
बारामती पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट! 'बिग बॉस' फेम बिचुकले मैदानात; थेट सुनेत्रा पवारांना देणार आव्हान

एकीकडे लग्नाचा आनंदसोहळा सुरु असताना अचानक झालेल्या चाकू हल्याच्या घटनेने आनंदात विजरन पडले. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ माजली असून पोलीस तपास करीत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येत तातडीने कारवाई केली होती. आरोपी पुतण्या हा अल्पवयीन, हत्येसाठी ऑनलाईन चाकू मागवला होता. या घटनेमुळे वर्धा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Crime
Baramati bypoll : सुनेत्रा पवारांविरोधात १९ उमेदवार मैदानात, संपूर्ण यादी समोर, वाचा कोण-कोण रिंगणात?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com