Kalyan News : उल्हास नदी वाचवा, ग्रामस्थांकडून निषेधाची होळी; थेट दिला आंदोलनाचा इशारा

kalyan news : उल्हास नदी वाचवण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. निषेधाची होळी करत ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला.
kalyan news
kalyan newsSaam tv
Published On
Summary

कल्याणमधील मोहने येथे उल्हास नदीसाठी निषेध होळी करण्यात आली

होळीच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृतीचा प्रयत्न करण्यात आला

सांडपाणी, रसायने आणि कचऱ्यामुळे नदी धोक्यात आलीये

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

देशभरात होळीचा सण साजरा होत असताना कल्याणमधील मोहाने येथे उल्हास नदी प्रदूषणाकडे लक्ष वेधण्यांसाठी निषेध होळीचे आयोजन करण्यात आलं होतं. कल्याणमधील मोहने परिसरात उल्हास नदी किनारी आज सोमवारी निषेध होळी कार्यक्रम उत्साहात आणि निर्धारपूर्वक पार पडला.

होळीच्या माध्यमातून नदी प्रदूषणाविरोधात जनजागृती करण्याचा आणि संबंधित यंत्रणांना जबाबदार धरण्याचा प्रयत्न करण्यात आला. सध्या उल्हास नदीतील वाढते सांडपाणी, औद्योगिक रसायने आणि कचऱ्यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याचा थेट परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याची भावना गावकरी आणि स्थानिकांनी व्यक्त केली.यावेळी गावकऱ्यांनी उल्हास नदीचे संरक्षण हे केवळ पर्यावरणाचे नाही, तर जनतेच्या आरोग्याचे आणि भावी पिढ्यांच्या हक्काचे साठी आंदोलन असल्याचे सांगितले.

kalyan news
इस्त्रायल-इराणच्या युद्धाचा शेतकऱ्यांना फटका; हजारो टन माल पडून, कोट्यावधी रुपयांचे नुकसान

आगामी काळात जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक आणि जबाबदार नेतृत्व देण्याचा निर्धार असून नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस कृती आराखडा राबवण्याचीमागणी यावेळी करण्यात आली.या वेळी मोठ्या संख्येने गावकरी व स्थानिक नागरिक आणि नदी बचाव समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

kalyan news
१ लाखांत घरी आणा ७ सीटर कार; मायलेज जबरदस्त, काय आहेत फिचर्स? वाचा सविस्तर

यावेळी प्रशासनाचा निषेध व्यक्त करत नदी वाचवा भविष्य वाचवा, असा जोरदार घोषणा देखील दिल्या निषेध होळीच्या माध्यमातून प्रशासनाने तातडीने कारवाई करून नदी स्वच्छतेसाठी ठोस पावले उचलावीत, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी गावकऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी दिला आहे.उल्हास नदीचे अस्तित्व टिकवण्यासाठी आता नागरिक रस्त्यावर उतरले असून, येणाऱ्या काळात या आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com