Beed : बीडमध्ये डॉक्टरची आत्महत्या; भाड्याच्या घरात सापडला मृतदेह

Beed Doctor Mandar Dabhade Sucide : अंबाजोगाईतील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Beed : बीडमध्ये डॉक्टरची आत्महत्या; भाड्याच्या घरात सापडला मृतदेह
Beed Doctor Mandar Dabhade SucideSaam Tv
Published On
Summary
  • अंबाजोगाईत निवासी डॉक्टरचा मृत्यू

  • डॉ. मंदार दाभाडे मृत अवस्थेत आढळले

  • कारण अद्याप स्पष्ट नाही, पोलिस तपास सुरू

  • वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली

योगेश काशीद, बीड

Beed Doctor Mandar Dabhade Sucide बीडच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ (स्वाराती) ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका निवासी डॉक्टरने भाड्याच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. या घटनेमुळे अंबाजोगाई शहरासह वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. मंदार दाभाडे असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मंदार दाभाडे हे चनई परिसरातील रोहिदास नगर भागात एका भाड्याच्या घरात वास्तव्यास होते. त्यांनी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. बराच वेळ त्यांच्या खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने ही बाब उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

Beed : बीडमध्ये डॉक्टरची आत्महत्या; भाड्याच्या घरात सापडला मृतदेह
Shocking : केबिनचा दरवाजा लावला,कपडे काढायला सांगितले अन्... उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत डॉक्टरचे अश्लील कृत्य

डॉ. मंदार दाभाडे हे सध्या वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेत होते आणि रुग्णालयातील दैनंदिन कामकाजातही अत्यंत सक्रिय असायचे. एक तरुण आणि होतकरू डॉक्टर, जो वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षण घेत होता, त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले? याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

Beed : बीडमध्ये डॉक्टरची आत्महत्या; भाड्याच्या घरात सापडला मृतदेह
Nanded Crime : नांदेड हादरले! शिवसेना कार्यकर्त्याची दिवसाढवळ्या हत्या, ४८ तासातली पाचवी घटना

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सहा पाठवला आहे. डॉ. दाभाडे यांच्या अशा अचानक जाण्याने स्वाराती रुग्णालयातील त्यांचे सहकारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. कामाचा ताण, वैयक्तिक कारण की अन्य काही बाबी, या दिशेने पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com