नांदेडमध्ये ४८ तासांत पाचवी हत्या
श्रीनगर भागात दिवसाढवळ्या तरुणाचा खून
शिवसेना कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची माहिती
शहरात भीतीचे वातावरण, पोलिस तपास सुरू
सागर सूर्यवंशी, नांदेड
Nanded Murder News Update नांदेडमध्ये गेल्या काही दिवसांत गुंडराज पाहायला मिळत आहे. गेल्या ४८ तासांत पाचवी हत्या करण्यात आली आहे. नांदेड शहरातील श्रीनगर भागात दिवसाढवळ्या तरुणाला रस्त्यात गाठून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. धक्कादायक म्हणजे हा तरुण शिंदेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचे उघडकीस आले आहे. या हत्येने नांदेडमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान ही हत्या का करण्यात आली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.
मिळलेल्या माहितीनुसार, सोनू कल्याणकर ( ३५ वर्षे ) असे या मृत तरुणाचे नाव आहे. आज सकाळी सहा वाजता नांदेड शहरातील श्रीनगर भागात तीन ते चार मारेकऱ्यांनी सोनू कल्याणकरला रस्त्यात गाठून धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या शरीरावर अनेक वार करण्यात आले. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. मात्र हा हल्ला का करण्यात आला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
सोनू कल्याणकर याच्यावर तीन वर्षांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. रींदा गँगचा सदस्य गोलू मंगनाळे याने त्याच्यावर गोळीबार केला होता. गोलू मंगनाळे सद्या तुरुंगात आहे. सोनू कल्याणकर हा तरुण राजकिय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय होता. सोनू कल्याणकर हा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे.
शुक्रवारी रात्री गॅंगवॉर मधून नांदेडमध्ये तीन जणांचा खून झाला. पुन्हा २४ तासात शनिवारी रात्री शहरातील मुरमुरा गल्लीत रंजित सिंघ तबेलेवाले या तरुणाचा खून झाला आणि आज सकाळीं सोनू कल्याणकर या तरुणाचा खून करण्यात आला. दरम्यान आता ४८ तासात नांदेड शहरात पाच खून झाल्याने कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.या घटनांनी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.