Bihar Politics: माजी मुख्यमंत्र्यांना काँग्रेसकडून ऑफर, भाजपचं टेन्शन वाढलं

Nitish Kumar: बिहारच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आरजेडीनंतर आता काँग्रेसकडून ऑफर आली आहे.
Bihar Politics: माजी मुख्यमंत्र्यांना काँग्रेसकडून ऑफर, भाजपचं टेन्शन वाढलं
Bihar Political NewsSaam Tv
Published On
  • बिहारमध्ये नितीश कुमार यांना काँग्रेसकडून महाआघाडीची ऑफर

  • आरजेडीनंतर काँग्रेसकडून नितीश कुमार यांना ऑफर

  • अखिलेश प्रसाद सिंह यांनी नितीश कुमार यांच्याबाबत केलं मोठं विधान

  • त्यामुळे भाजपचे टेन्शन वाढलं

बिहारमध्ये मोठी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांना आरजेडीनंतर आता काँग्रेसकडून ऑफर मिळाली आहे. बिहारमधील एनडीए सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे असा खळबळजनक दावा बिहार काँग्रेसचे नेते आणि खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांनी केला आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी नितीश कुमार यांना महाआघाडीत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला.

काँग्रेस नेते आणि खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांनी सांगितले की, 'एनडीएमध्ये सध्या काहीही ठीक नाही. नितीश कुमार यांची विचारधारा नेहमीच समाजवादी राहिली आहे. भाजप ज्या प्रकारचा अजेंडा आखत आहे त्यामुळे नितीश कुमार यांना अस्वस्थ वाटणे स्वाभाविक आहे. ते कोणत्या परिस्थितीत तिथे गेले हे मला माहीत नाही. त्यांचे खरे स्थान समाजवाद आहे. तिथे त्यांची अस्वस्थता जसजशी वाढत जाईल तसतसे त्यांना पायउतार व्हावे लागेल.'

Bihar Politics: माजी मुख्यमंत्र्यांना काँग्रेसकडून ऑफर, भाजपचं टेन्शन वाढलं
Politics : राजकारणात मोठी उलथापालथ! माजी मुख्यमंत्र्यांच्या निष्ठावान नेत्यानं साथ सोडली; भाजपने डाव टाकला

काँग्रेस खासदार प्रसाद सिंह हे नितीश कुमार यांच्याबद्दल म्हणाले की, 'त्यांनी निश्चितपणे महाआघाडीत सामील व्हायला पाहिजे. नैसर्गिक आघाडी आधीच अस्तित्वात आहे. काँग्रेसच्या आधी आरजेडीचे भाई वीरेंद्र यांनी नितीश कुमार यांना जेडीयूसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. आता काँग्रेसनेही त्याला सहमती दर्शवली आहे. जेडीयूने यावर अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नसली तरी देखील अशा वक्तव्यांमुळे बिहारमध्ये भाजपचं टेन्शन निश्चितच वाढले आहे.

Bihar Politics: माजी मुख्यमंत्र्यांना काँग्रेसकडून ऑफर, भाजपचं टेन्शन वाढलं
Politics: मोठी बातमी! ममता बॅनर्जींना झटका, निवडणूक आयोगाने TMC चं नाव आणि चिन्ह गोठवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com