राहुल गांधींच्या परीक्षेत 50% सचिव नापास; परीक्षा पॅटर्नमुळे काँग्रेस यश मिळणार?

Rahul Gandhi’s Secretaries’ Assessment: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षातील सचिवांची परीक्षा घेतलीय.. मात्र या परीक्षेचा निकाल काय आलाय? परीक्षेत सचिवांना नेमके काय प्रश्न विचारण्यात आले? या परीक्षा पॅटर्नमुळे काँग्रेसला यश मिळणार का? पाहूयात या रिपोर्टमधून.
Rahul Gandhi assessment of Congress AICC secretaries 2026
Rahul Gandhi assessment of Congress AICC secretaries 2026
Published On
Summary
  • राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी काँग्रेसच्या AICC सचिवांचा थेट आढावा घेतला

  • काँग्रेसमध्ये मोठ्या संघटनात्मक फेरबदलाची प्रक्रिया सुरू

  • सुमारे 50 टक्के सचिवांमध्ये बदल होण्याची शक्यता

काँग्रेस पक्षांतर्गत संघटनात्मक पातळीवर मोठ्या फेरबदलांची जोरदार तयारी सुरू असतानाच, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी काँग्रेसमधील सचिवांची थेट शाळाच घेतलीय. नवी दिल्लीतील जनपथ येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत 64 सचिवांची राहुल गांधींनी परीक्षा घेतली. मात्र या परीक्षेत तब्बल ५० टक्के सचिव नापास झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

काँग्रेसची शाळा, सचिवांची परीक्षा

राहुल आणि प्रियंका गांधींकडून AICCच्या 64 सचिवांची परीक्षा घेत मूल्यांकन

64 सचिवांना 4 गटांमध्ये विभागून प्रत्येकाला 5 ते 6 अनपेक्षित आणि वैचारिक प्रश्न विचारले

काँग्रेसची कोणती चूक सुधारायची? असा थेट प्रश्न

उत्तरं देताना काही सचिव विषयांतर करत असल्यानं आणि मुद्देसूद न बोलल्यानं नाराजी

परीक्षेत फेल झालेले जवळपास 50% AICC सचिव बदलले जाणार?

दरम्यान राहुल गांधींनी सचिवांना कोणते प्रश्न विचारले...पाहूयात.

राहुल गांधींनी सचिवांना केलेले सवाल

काँग्रेसनं केलेली एक चूक, जी सुधारण्याची गरज आहे?

तुमच्या जबाबदारीच्या राज्यातील 5 प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांची नावं

तुमच्या मते AICCचे 3 सर्वोत्तम सचिव कोण? आणि का?

AICC सचिवाच्या कामाची पद्धत एका शब्दात कशी सांगाल?

तुमच्या राज्यात पक्षात काय योग्य आणि काय अयोग्य सुरू आहे?

काँग्रेस पक्षातील सचिव हे महासचिव आणि राज्यांच्या प्रभारींसोबत संघटनात्मक कामकाजावर लक्ष ठेवतात. याआधी काँग्रेसनं सचिवपदासाठी तब्बल 130 इच्छुकांच्या नव्याने मुलाखती घेतल्या. त्यातच आता या 64 विद्यमान सचिवांच्या मूल्यांकनात निम्म्याहून अधिक सचिव अपयशी ठरल्याने हे सचिव बदलले जाण्याची शक्यता निर्माण झालीय. नव्या आणि कार्यक्षम चेहऱ्यांना संधी देऊन पक्ष संघटन तळागाळात अधिक मजबूत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र ह्या परीक्षा पॅटर्नमुळे काँग्रेसला यश मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com