Politics: मोठी बातमी! ममता बॅनर्जींना झटका, निवडणूक आयोगाने TMC चं नाव आणि चिन्ह गोठवलं

TMC News: निवडणूक आयोगाकडून ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसला. टीएमसी पक्षाचे नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले.
Politics: मोठी बातमी! ममता बॅनर्जींना झटका, निवडणूक आयोगाने TMC चं नाव आणि चिन्ह गोठावलं
TMC CrisisSaam Tv
Published On
  • ममता बॅनर्जींच्या टीएमसीला मोठा झटका

  • टीएमसीच्या नाव आणि चिन्हावर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

  • निवडणूक आयोगाने टीएमसीचे नाव आणि चिन्ह गोठवले

  • ममता बॅनर्जी आणि ऋतब्रता बॅनर्जी गटात टीएमसीवरून वाद

पश्चिम बंगालच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला. निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवले. चिन्हाच्या वादावरून टीएमसीमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय घेतला आहे. पोटनिवडणुकीपूर्वी हा ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का मानला जात आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार, टीएमसी पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवण्यात आले आहे. कोणताही गट पोटनिवडणुकीमध्ये पक्षाचे नाव आणि चिन्हाचा वापर करू शकणार नाही. शुक्रवारी ममता बॅनर्जी यांच्या गटाकडून आणि ऋतब्रता यांच्या गटांकडून पक्षाचे नवीन नाव आणि निवडणूक चिन्हाची मागणी केली जाईल. दोन्ही गटाला निवडणूक आयोगाने प्रत्येकी ३ पर्याय देण्यास सांगितले आहे. दोन्ही गटांना निवडणूक आयोगाने उद्या सकाळी ११ वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे.

Politics: मोठी बातमी! ममता बॅनर्जींना झटका, निवडणूक आयोगाने TMC चं नाव आणि चिन्ह गोठावलं
Maharashtra Politics: अर्धा तास चर्चा नंतर एकाच कारमधून प्रवास; शिंदे आणि शहांमध्ये शिजतंय काय? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपापल्या गटासाठी ३ नावे आणि निवडणूक आयोगाच्या मुक्त चिन्हांच्या यादीतून तीन निवडणूक चिन्हांचे पर्याय १८ सप्टेंबरपर्यंत सादर करण्यास सांगितले आहे. ही व्यवस्था पोटनिवडणुकांसाठी लागू होईल. गुरुवारी जारी केलेल्या अंतरिम आदेशात निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, अरूप रॉय यांच्या नेतृत्वाखालील गट किंवा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गट 'ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस' हे नाव थेट वापरू शकणार नाही. दोन्ही गटांना पक्षासाठी राखीव असलेले 'दोन फुले आणि 'गवत' हे चिन्ह वापरण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

Politics: मोठी बातमी! ममता बॅनर्जींना झटका, निवडणूक आयोगाने TMC चं नाव आणि चिन्ह गोठावलं
ममता बॅनर्जी पुन्हा संतापल्या! थेट TMC कार्यकर्त्याला कानशिलात लगावली; व्हिडिओ व्हायरल होताच राजकारण तापलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com