EC: भाजप आणि काँग्रेसच्या एकमेकांविरोधात तक्रारी, निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांना बजावली नोटीस

Election Commission: निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेसच्या अध्यक्षांना नोटीस बजावत त्यांच्याकडून उत्तर मागवलंय. आयोगाने ही नोटीस का पाठवलीय, काय आहे कारण हे जाणून घेऊ.
EC: भाजप आणि काँग्रेसच्या एकमेकांविरोधात तक्रारी, निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांना बजावली नोटीस
Election Commission
Published On

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचा जोर वाढलाय. प्रचार सभांचा धुराळ उडालाय. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालय. निवडणुकीचा जोर चढला असताना ऐन निवडणुकीच्या धामधुमीत निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेसच्या अध्यक्षांना नोटीस बजावलीय. या कारवाईचं काय कारण आहे, हे जाणून घेऊ.

दोन्ही राज्यांत राजकीय पक्षांचा प्रचार जोमाने सुरू असून पक्षश्रेष्ठींतील शब्दयुद्ध तीव्र झाले आहे. या शाब्दिक युद्धात भाजप आणि काँग्रेसने एकमेकांवर आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आलीय. यावर निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडून उत्तरे मागवली आहेत. काँग्रेसने केलेल्या तक्रारीवर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून उत्तर मागितलंय. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनाही भाजपने केलेल्या तक्रारीवर उत्तर देण्यास सांगितले आहे.

EC: भाजप आणि काँग्रेसच्या एकमेकांविरोधात तक्रारी, निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांना बजावली नोटीस
PM Modi Pune Visit: PM मोदींचा पुणे दौरा! शहरातील विविध ठिकाणे पार्किंगसाठी आरक्षित, खासगी उड्डाणांवरही बंदी; वाचा सविस्तर

निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांना १८ नोव्हेंबरपर्यंत दुपारी एक वाजेपर्यंत औपचारिक उत्तर मागितलंय. यासह लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान २२ मे २०२४ ला जारी करण्यात आलेल्या निवडणूक आयोगाच्या पूर्व सल्लामसलतीची आठवण करून दिली.यात स्टार प्रचारक आणि नेत्यांवरील नियंत्रण ठेवण्यास सांगण्यात आले होते. ज्यामुळे सार्वजनिक शिष्टाचारचा उल्लंघन होऊ नये आणि निवडणूक प्रचारादरम्यान आदर्श आचार संहितेचं पालन करावे.

EC: भाजप आणि काँग्रेसच्या एकमेकांविरोधात तक्रारी, निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांना बजावली नोटीस
CM Shinde: तुम्ही एकनाथ शिंदेला हलक्यात घेतलं, दापोलीच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

काँग्रेसने १४ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान खोटी, फूट पाडणारी, दुर्भावनापूर्ण आणि निषेधार्ह विधाने केल्याचा आरोप केला होता. विरोधी पक्षाच्याविरोधात महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणूक प्रक्रियेदरम्यान द्वेष पसरवणारे भाषणं करणाऱ्या भाजपच्या नेत्यांविरोधात तक्रार गुन्हेगारी तक्रार दाखल करण्यात याव्यात, तसे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे येथील निवडणूक रॅलींमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना लक्ष्य करत अनेक खोटी, दुर्भावनापूर्ण आणि निषेधार्ह विधाने केली होती, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला होता. त्यांनी आपल्या वक्तव्यात काँग्रेसचे प्रमुख नेते आणि माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यावर आरोप केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com