उद्धव ठाकरे मला म्हणालेत दहा दिवस थांबा की तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो. तुम्ही कोणाला धमक्या देत आहात. मी कोणाच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. कुणाला जेलची भाषा बोलताय , तुम्ही एकनाथ शिंदेंना हलक्यात घेतलं. असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंनी डिवचलंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दापोलीतील प्रचार सभेत बोलत होते. शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी दापोलीत सभा घेतली. या सभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलंय. दापोलीची जमीन ही पवित्र आणि संपन्न आहे, याच भूमीत बाळासाहेबांचा भगवा झेंडा हातात घेऊन योगेश कदम उभा आहे. योगेश कदम यांचा विजय पक्का आहे . 23 तारखेला गुलाल उधळायचा दिवाळी साजरी करायची आहे.
दापोलीमध्ये विकासाची गंगा आणायची आहे. साडेतीन हजार कोटी रुपयांची कामे आपल्या सरकारने येथे केले आहे. यापूर्वीचे मुख्यमंत्री भेटतच नव्हते तर निधी मिळणार कुठून, असा सवाल करत मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे मला म्हणालेत १० दिवस थांबा की तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो. या धमक्यांना आपण घाबरत नसल्याचं शिंदे म्हणालेत. शिवसेनेचा वचननामा हा एक ट्रेलर असून त्याचा पिक्चर बाकी असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांना या निवडणुकीत जोडा दाखवा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. लाडकी बहीण योजनेच्या विरोधात मविआ नेते न्यायालयात गेले. न्यायालयाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. योजना बंद करावी म्हणून विरोधक हात धुवून पाठी लागले होते. कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकलीय. आता कोणी लाडक्या बहिणी विरोधात पाहील त्याला फाशी मिळेल, असा इशारा मुख्यमंत्री शिंदेंनी दिलाय.
तुम्ही एकनाथ शिंदेला हलक्यात घेतलं. त्यामुळे टांगा पलटी घोडे पसार झाले. खरं तर शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं. पण शिवसेना काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली. लोकांशी तुम्ही विश्वासघात केला. आम्ही शिवसेना बाळासाहेबांची पुढील येतोय . आम्ही धनुष्यबाण वाचवतोय.आम्ही धनुष्यबाण वाचवला आणि सोडवलादेखील , असं मुख्यमंत्री म्हणाले. दिल्लीच्या गल्लीमध्ये आम्हाला मुख्यमंत्री करा आम्हाला मुख्यमंत्री करा म्हणून दिल्लीतल्या गल्लीत आम्ही जात नाही तर आम्हाला विकासासाठी काही निधी मिळावा म्हणून आम्ही तिथे जातो.
खोके खोके काय करताय. मुख्यमंत्री झालेला माणूस काय बोलतोय. बॅगांमध्ये काही नसणार, कारण त्यांना खोके नाही तर कंटेनर लागतात.कंटेनर कुठल्या राज्यात गेले हे आम्हाला बोलायला लावू नका. तुम्ही आयत्या बिळावर नागोबा बसलात. ते सरकारसुद्धा तुम्ही व्यवस्थित चालू शकला नाहीत. एकनाथ शिंदे यांनी 50 आमदार घेऊन आम्ही सत्तेच्या विरोधात गेलो. बाळासाहेबांशी बेईमानी करणाऱ्यांना कोकणात थारा मिळणार नाही. लोकसभेत ते दाखवून दिलं असून ठाकरेंची मशाल ही क्रांतीची नाही तर घराघरात आग लावणारी ही मशाल आहे, असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला.
लोकसभेत तुम्हाला एकही जागा मिळाली नाही. कोकण आमच्या मागे उभे राहिलं आहे. जनतेने तुमचे सगळे बालेकिल्ले आणि गड उद्ध्वस्त केले. लोकसभेप्रमाणेच विधानसभेत निकाल येणार असून कोकणात एकही जागा उद्धव ठाकरे सेनेला मिळणार नाही. संपूर्ण जागा या महायुतीला मिळतील. धनुष्यबाणाशी कोकणची जनता प्रामाणिक असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.