शाळांच्या वेळेत मोठा बदल! आता या दिवशी ‘हाफ डे’, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

Bihar Government School New Timing Saturday Half Day Details: बिहारमधील सरकारी शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. आता शनिवारी ‘हाफ डे’ लागू होणार असून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना दिलासा मिळणार आहे. नवीन वेळापत्रक जाणून घ्या.
BIHAR SCHOOL TIMING CHANGE: SATURDAY HALF DAY ANNOUNCED FOR GOVERNMENT SCHOOLS
BIHAR SCHOOL TIMING CHANGE: SATURDAY HALF DAY ANNOUNCED FOR GOVERNMENT SCHOOLSsaam tv
Published On

बिहारमधील सरकारी शाळेच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाच्या माध्यमिक शिक्षण कार्यालयाने राज्यातील सर्व सरकारी शाळांच्या कार्यकाळात सुधारणा करत शनिवारी 'हाफ डे' लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील गुरुवारी माध्यमिक शिक्षण संचालक सज्जन आर यांच्या स्वाक्षरीने आदेश देण्यात आला आहे. विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार 12 डिसेंबर 2025 रोजी काढलेल्या आधीच्या आदेशात सुधारणा करण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार सोमवार ते शुक्रवार शाळा पूर्वीप्रमाने सकाळी 9.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र शनिवारी शाळा सकाळी 9.30 ते 1वाजेपर्यंत चालणार आहेत.

BIHAR SCHOOL TIMING CHANGE: SATURDAY HALF DAY ANNOUNCED FOR GOVERNMENT SCHOOLS
shivsena : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? थोड्याच वेळात सुनावणीला होणार सुरूवात

प्राथमिक आणि माध्यमिक इयत्ता पहिली ते आठवी शाळांमध्ये सकाळी 9.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वर्ग आणि नियोजित उपक्रम होतील. त्यानंतर 12 ते 12.40 या वेळेत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाईल आणि लगेचच सुट्टी जाहीर केली जाईल. तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक इयत्ता 9 ते 12 शाळांमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत अध्यापन आणि इतर शैक्षणिक उपक्रम होतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडून दिले जाईल.

BIHAR SCHOOL TIMING CHANGE: SATURDAY HALF DAY ANNOUNCED FOR GOVERNMENT SCHOOLS
कॉक्रोच जनता पार्टीची आगामी रणनीती ठरली; अभिजीत दीपकेंनी केली सर्वात मोठी घोषणा! मोदी सरकारचं टेन्शन वाढलं

शिक्षण विभागाने शिक्षकांच्या शैक्षणिक कामांबाबतही महत्वाचे निर्देश दिले आहेत. या आदेशानुसार शिक्षकांना दररोज शाळा संपल्यानंतर एक तास काम करणे बंधनकारक असेल. या काळात ते पुढील दिवस आणि आठवड्याचे प्लॅन तयार करतील. विद्यार्थ्यांच्या गृहपाठाची तपासणी करतील तसेच प्रयोगशाळा व्यवस्थापनासारखी कामे पार पडतील.

BIHAR SCHOOL TIMING CHANGE: SATURDAY HALF DAY ANNOUNCED FOR GOVERNMENT SCHOOLS
Tarun Tejapal: तरुण तेजपाल यांना मोठा झटका, लैंगिक अत्याचार प्रकरणात हायकोर्टाने ठरवले दोषी

हे सर्व शैक्षणिक काम किंवा रेमेडियल क्लासेस पूर्ण केल्यानंतरच शिक्षकांना शाळा सोडण्याची परवानगी असेल. विभागाने स्पष्ट केले आहे की, इतर सर्व अटी पूर्ववत राहतील. या निर्णयामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शनिवारी ‘हाफ डे’ असल्याने विद्यार्थ्यांना आठवड्याच्या शेवटी मानसिक विश्रांती मिळणार आहे. त्याचबरोबर शिक्षकांनाही पुढील आठवड्याच्या अभ्यास आणि मूल्यांकनाची तयारी करण्यासाठी अधिक वेळ मिळणार असल्याने या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com