Tarun Tejapal: तरुण तेजपाल यांना मोठा झटका, लैंगिक अत्याचार प्रकरणात हायकोर्टाने ठरवले दोषी

Mumbai High Court On Tarun Tejapal: लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टाने तरुण तेजपाल यांना दोषी ठरवलं. गोवा सरकारने तरुण तेजपाल यांच्या कोठडीची मागणी केली.
Tarun Tejapal: तरुण तेजपाल यांना मोठा झटका, लैंगिक अत्याचार प्रकरणात हायकोर्टाने ठरवले दोषी
Tarun TejapalSaam Tv
Published On
  • तरुण तेजपाल लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी

  • मुंबई हायकोर्टाने दिला मोठा निर्णय

  • २०१३ तहलका प्रकरणात हायकोर्टाचा तेजपाल यांना दणका

  • गोवा सरकारच्या अपीलला हायकोर्टाची मंजुरी

'तहलका'चे माजी संपादक इन चीफ तरुण तेजपाल यांना मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाने मोठा झटका दिला. तरुण तेजपाल यांना २०१३ च्या लैंगिक अत्याचार प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवले. मे २०२१ मध्ये सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्दोष मुक्ततेच्या निकालाला आव्हान देणारे गोवा सरकारचे अपील स्वीकारत हायकोर्टाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला. हायकोर्टने तरुण तेजपाल यांना या बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले.

अतिरिक्त सत्र न्यायालयाने मे २०२१ मध्ये दिलेल्या ५२७ पानांच्या विस्तृत निकालाला राज्य सरकारने हायकोर्टात आव्हान दिले होते. सत्र न्यायालयाने पुराव्यांचे मूल्यांकन करताना गंभीर चुका केल्या आणि पीडितेच्या साक्षीची तपासणी करताना चुकीचा दृष्टिकोन स्वीकारला, असा युक्तिवाद राज्य सरकारतर्फे करण्यात आला होता. २०२१ च्या गोवा सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालामध्ये त्यांना संशयाचा फायदा घेऊन निर्दोष मुक्त करण्यात आले होते. गोवा सरकारने तरुण तेजपाल यांच्या कोठडीची मागणी केली.

Tarun Tejapal: तरुण तेजपाल यांना मोठा झटका, लैंगिक अत्याचार प्रकरणात हायकोर्टाने ठरवले दोषी
Bombay High Court: 'समानतेचा अधिकार सोयीप्रमाणे वापरता येत नाही'; पोटगीवर मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!

नोव्हेंबर २०१३ मध्ये गोव्यातील बांबोळी येथील 'ग्रँड हयात' हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका थिंकफेस्ट कार्यक्रमादरम्यान हॉटेलच्या लिफ्टमध्ये तेजपाल यांनी आपल्या एका माजी कनिष्ठ सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. ७ आणि ८ नोव्हेंबर २०१३ च्या रात्री या घटना घडल्याचा आरोप होता. माध्यमांमधील वृत्तानंतर गोवा पोलिसांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू करून गुन्हा दाखल केला आणि आरोपपत्र दाखल केले. तथापि, २१ मे २०२१ रोजी सत्र न्यायालयाने आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे नमूद करत तेजपालची सर्व आरोपांतून मुक्तता केली होती.

Tarun Tejapal: तरुण तेजपाल यांना मोठा झटका, लैंगिक अत्याचार प्रकरणात हायकोर्टाने ठरवले दोषी
Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

वाचा संपूर्ण घटनाक्रम -

७ नोव्हेंबर २०१३ (रात्र) -

बांबोळी येथील ग्रँड हयात हॉटेलच्या ब्लॉक ७ मधील गेस्ट लिफ्टमध्ये पहिली कथित घटना घडली. आरोपीने पीडितेला लिफ्टमध्ये बेकायदेशीरपणे रोखून धरून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप.

८ नोव्हेंबर २०१३ -

त्याच हॉटेलच्या ब्लॉक ७ मधील उजव्या बाजूच्या गेस्ट लिफ्टमध्ये दुसरी कथित घटना घडली. आरोपीने पुन्हा पीडितेला रोखून धरत तिचे चुंबन घेऊन, ड्रेस वर करून विनयभंग केल्याचा आरोप.

२१ नोव्हेंबर २०१३ -

घटनेबाबतची माहिती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली. या वृत्तांची दखल घेत व पीडितेच्या ईमेल तक्रारीच्या आधारे गोवा पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली.

Tarun Tejapal: तरुण तेजपाल यांना मोठा झटका, लैंगिक अत्याचार प्रकरणात हायकोर्टाने ठरवले दोषी
Supreme Court: शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार? सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात दावा

२४ फेब्रुवारी २०१४ -

पणजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हे प्रकरण अधिकृतपणे नोंदवले गेले.

२१ मे २०२१ -

पणजी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने तरुण तेजपाल यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता करणारा निकाल दिला.

६ ऑगस्ट २०२६ -

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सत्र न्यायालयाचा निर्दोष मुक्ततेचा निकाल केला रद्द आणि ठरवले दोषी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com