Preity Zinta: बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या गैरवापराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोशल मीडिया आणि विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तिचे AIने तयार केलेले डीपफेक फोटो, व्हिडिओ आणि मॉर्फ केलेला मॅसेज प्रसारित होत असल्याचा दावा करत तिने न्यायालयाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने ऑनलाइन प्लॅटफॉर्मना आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचा आदेश दिला आहे.
आजच्या डिजिटल युगात AI च्या मदतीने बनवले जाणारे डीपफेक व्हिडिओ आणि फोटो ही मोठी समस्या बनत चालली आहे. अनेक कलाकारांच्या फोटोचा गैरवापर करून बनावट फोटो, व्हिडिओ आणि चॅट सोशल मीडियावर व्हायरल केले जातात. त्यामुळे कलाकारांच्या इमेजला धक्का पोहोचतो.
प्रीती झिंटाने आपल्या याचिकेत सोशल मीडिया आणि विविध वेबसाइट्सवर प्रसारित होत असलेले AIच्या डीपफेक फोटो, मॉर्फ केलेले व्हिडिओ आणि चॅटला हटवण्याची मागणी केली आहे. याशिवाय भविष्यात अशा प्रकारचा कोणताही अनधिकृत मजकूर प्रकाशित करण्यास संबंधितांवर करण्याचा आदेश देण्याची विनंतीही त्यांनी न्यायालयाकडे केली आहे.
या प्रकरणावर न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि संबंधित संस्थांनी आक्षेपार्ह मजकूर त्वरित हटवण्याचे आदेश देत या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ जुलै रोजी होणार असल्याचे म्हटले.
यापूर्वीही ऐश्वर्या राय, जॅकी श्रॉफ आणि सलमान खान यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांनी आपल्या 'पर्सनॅलिटी राइट्स'च्या संरक्षणासाठी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. न्यायालयाने अशा प्रकरणांमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना जबाबदारीने वागण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, प्रीती झिंटा अनेक वर्षांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ती अभिनेता सनी देओलसोबत 'बंटवारा' या चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट ऑगस्टमध्ये प्रदर्शित होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.