कॉक्रोच जनता पार्टीची आगामी रणनीती ठरली; अभिजीत दीपकेंनी केली सर्वात मोठी घोषणा! मोदी सरकारचं टेन्शन वाढलं

Abhijeet Deepke CJP National Campaign Kya Bolti Public: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पक्षाची आगामी रणनीती जाहीर केली. बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था आणि मोदी सरकारवर त्यांनी जोरदार टीका करत देशभरात ‘क्या बोलती पब्लिक’ मोहीम राबवण्याची घोषणा केली.
CJP founder Abhijeet Deepke addressing press conference, announces nationwide “Kya Bolti Public” campaign targeting unemployment and education issues.
CJP founder Abhijeet Deepke addressing press conference, announces nationwide “Kya Bolti Public” campaign targeting unemployment and education issues.saam tv
Published On

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आज आपल्या पार्टीची आगामी भूमिकेबद्दल माहिती दिली. प्रधानांचा राजीनामा हा आमचा विजय आहे. आमची विचारधारा ही संविधानाची विचारधारा, तसेच या देशात शिक्षण घेणे म्हणजे डोक्यावर कर्ज घेण्यासारखं आहे. या देशातील शिक्षणव्यवस्था बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. आमच्या आंदोलनामुळे लोकांच्या मनातील भीती कमी झाली आहे. सामान्य लोकांच्या न्यायासाठी लोकांकडे वेळ नसतो. तसेच आगामी काळात देशभरात सीजेपी देशभरात मोहीम राबवणार, क्या बोलती पब्लिक नावाने कॅम्पेन राबवणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

आयोजित पत्रकार परिषदमध्ये अभिजीत दीपके यांनी थेट सरकारसमोर एक मोठे आव्हान उभे केले आहे. एका प्रमुख विरोधी पक्षासारखी त्यांची रणनीती असल्याचे दिसून आले. पुढे दीपके म्हणाले, बेरोजगारी हा देशातील सर्वात मोठा मुद्दा आहे. जंतर-मंतरवर मोठ्या संख्येने बेरोजगार आले होते. आमचे भविष्य अशिक्षित लोक ठरवता आहेत. आम्ही बेरोजगारीच्या मुद्द्यावर काम करणार. कोर्टात जाऊन पक्ष चोरला जातो. लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडत चालला आहे. 2014 साली लोकांना विकासाचे फक्त स्वप्न दाखवलं गेलं असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

CJP founder Abhijeet Deepke addressing press conference, announces nationwide “Kya Bolti Public” campaign targeting unemployment and education issues.
Shivsena: शिवसेना कुणाची? थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टात सुनावणी; फेब्रुवारी २०२३ ते जुलै २०२६ मधील संपूर्ण घटनाक्रम वाचा

दीपके यांनी पुढे सांगितले की, देशातील सुमारे 65 टक्के लोकसंख्या ही 35 वर्षांखालील आहे. मात्र त्यांच्या प्रश्नांकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही. विशेषतः बेरोजगारी आणि शिक्षण ते तरुणांसाठी सर्वात मोठे मुद्दे असल्याचे ते म्हणाले. सध्या सत्ताधारी केवळ हिंदू-मुस्लिम मुद्यांवर राजकारण करत आहेत आणि समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे CJP आता थेट लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घेणार आहे. येत्या काळात “क्या बोलती पब्लिक” या देशव्यापी मोहिमेअंतर्गत विविध शहरांमध्ये संवाद साधला जाणार आहे. शिक्षण हा या मोहिमेचा मुख्य मुद्दा असणार असून, शिक्षणासाठी होणारा वाढता खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही दीपके यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com