Pakistani Agent Shahzad Arrested in Moradabad
Pakistani Agent Shahzad Arrested in MoradabadANI

Pak Spy : ज्योती मल्होत्रानंतर आणखी एका पाकिस्तानी गुप्तहेराला बेड्या, ISI साठी करायचा काम

Pakistani spy arrested : ज्योती मल्होत्रा प्रकरणानंतर यूपी एटीएसने आणखी एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक केली आहे. रामपूरमधील शहजाद याला मुरादाबाद येथून अटक करण्यात आली. तो ISI साठी हेरगिरी आणि तस्करी करत असल्याचे पुरावे एटीएसकडे आहेत.
Published on

Pakistani Agent Shahzad Arrested in Moradabad : ज्योती मल्होत्रा हिच्यानंतर यूपी एटीएसने उत्तर प्रदेशमधून आणखी एका पाकिस्तानी एजेंटला बेड्या ठोकल्या आहेत. रामपूरमधील शहजाद याला एटीएसने मुरादाबाद येथून बेड्या ठोकल्या आहेत. पाकिस्तानच्या गुप्तचर एजन्सीसाठी शहजाद काम करत असल्याचा आरोप एटीएसने केला आहे. एटीएसकडे तसे पुरवे आहेत. ATS IPC च्या कलम १४८ आणि १५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ज्योती मल्होत्रा प्रकरणामुळे देशात खळबळ उडाली असतानाच उत्तर प्रदेशमधून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या काही दिवसांत एटीएसने पाकड्यांना मदत करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. दोन आठवड्यात ८ ते १० जणांना बेड्या ठोकल्याची माहिती मिळाली आहे.

उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मुरादाबाद येथून रविवारी रात्री शहजाद याला अटक केली. शहजादवर पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI साठी हेरगिरी आणि तस्करीचा आरोप आहे. उत्तर प्रदेश ATS ने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, रामपूरमधील शहजाद मागील काही वर्षांपासून पाकिस्तानात जाऊन कॉस्मेटिक्स, कपडे, मसाले आणि इतर वस्तूंची भारत-पाकिस्तान सीमेवर अवैध तस्करी करत होता. या तस्करीच्या आडून शहजाद ISI साठी गुप्तपणे काम करत होता. याबाबत ATS कडे पुरावे आहेत.

Pakistani Agent Shahzad Arrested in Moradabad
Mumbai Coronavirus : काळजी घ्या! मुंबईत कोरोना परतला, २ संशयित रूग्णांचा मृत्यू?

ATS ने दिलेल्या माहितीनुसार, शहजादचे ISI च्या एजंटसोबत जवळचे संबंध होते. तो त्यांच्याशी सतत संपर्कात होता. त्याने भारताच्या सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती ISI ला पुरवली. याशिवाय, त्याने ISI च्या सांगण्यावरून भारतातील त्यांच्या एजंटांना आर्थिक मदत केली. पाकिस्तानी एजेंटला भारतीय सिम कार्ड्स उपलब्ध करून दिले. शहजादने रामपूर आणि उत्तर प्रदेशच्या इतर भागांतील काही व्यक्तींना तस्करीच्या बहाण्याने ISI साठी काम करण्यासाठी पाकिस्तानात पाठवले. या व्यक्तींचे व्हिसा आणि इतर व्यवस्था ISI च्या एजंटांमार्फत केली जात होती.

Pakistani Agent Shahzad Arrested in Moradabad
Ratnagiri Accident : अंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, जगबुडी नदीत कार कोसळून ५ जणांचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com