Mumbai Coronavirus : काळजी घ्या! मुंबईत कोरोना परतला, २ संशयित रूग्णांचा मृत्यू?

COVID Alert in Mumbai: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन करोनासदृश लक्षणे असलेल्या रुग्णांचा मृत्यू. करोना असल्याची पुष्टी अद्याप नाही, पण नागरिकांनी सतर्क राहावे, असे प्रशासनाचे आवाहन.
Mumbai Coronavirus
Mumbai CoronavirusSaam TV News
Published On

Mumbai Coronavirus News in Marathi : सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये करोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलेय. दोन्ही शहरांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे जगभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या लाटेचा धोका निर्माण झालाय. त्यातच आता मुंबईमधूनही चिंतेची बातमी समोर आलेली आहे. रिपोर्ट्सनुसार, मुंबईमध्ये दोन कोरोना रूग्णांचा मृत्यू झाल्याचे समजतेय. मुंबईतील केईएम रुग्णालयामध्ये संशयित करोनाबाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही रूग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसून त्यांना असलेल्या इतर आजारांमुळे झाल्याचे रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. पण दोन रूग्णांच्या मृत्यूनंतर प्रशासन अलर्ट झालेय.

मृत झालेल्या दोन्ही रूग्णांना कोरोनाची लक्षणे दिसत होती, त्यामुळे केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारावेळीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा कोरोनाच्या भीतीने चिंता निर्माण झाली आहे. केईएम रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही रुग्ण गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे होती. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, त्यांचा अहवाल अद्याप मिळालेला नाही.

Mumbai Coronavirus
Mumbai Coronavirus : 'तो' पुन्हा येतोय? मास्क लावायची तयारी ठेवा, मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या वाढली

संशयित दोन्ही कोरोना रुग्णांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर योग्य उपचार सुरू होते. परंतु त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना वाचवणे शक्य झाले नाही, असे केईएम रुग्णालय प्रशासनाने सांगितले. मुंबई महानगरपालिकेने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. तसेच, नागरिकांना मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे आणि हात धुणे यासारख्या गोष्टी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने सुचवले आहे.

Mumbai Coronavirus
Ratnagiri Accident : अंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, जगबुडी नदीत कार कोसळून ५ जणांचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com