Ratnagiri Accident : अंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, जगबुडी नदीत कार कोसळून ५ जणांचा जागीच मृत्यू

Khed car accident, Jagbudi river crash : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे अंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबाची कार जगबुडी नदीत कोसळून ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. वाहनाचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती आहे.
Ratnagiri accident, Car falls in river
A tragic car accident in Khed, Ratnagiri claimed five lives as a family on their way to a funeral plunged into the Jagbudi RiverSaam TV News
Published On

Ratnagiri accident, Car falls in river : अंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. खेडमधील जगबुडी नदीपात्रात कार कोसळून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कारमधील सर्व प्रवासी एकाच कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती आहे..

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावर खेडमध्ये भीषण अपघात झाला आहे. खेडमधील जगबुडी नदीपात्रात कार कोसळून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई मिरा रोड येथून देवरुख येथे अंत्यसंस्काराला निघालेल्या कुटुंबीयांचा दुर्दैवी अंत झाला आहे.

Ratnagiri accident, Car falls in river
Maharashtra Monsoon : खूशखबर! १० जूनपर्यंत मॉन्सून महाराष्ट्र व्यापणार, आज ५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट नदीपात्रात कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले, परंतु पाचही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी खेड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Ratnagiri accident, Car falls in river
Midnight Robbery : सर्व साखरझोपेत, गुरवांच्या घरात दरोडा, १४ तोळ्यावर हात साफ, महिलेचा मृत्यू; कोल्हापूर हादरलं

विवेक श्रीराम मोरे, मिताली विवेक मोरे, मिहार विवेक मोरे, श्रेयस राजेंद्र सावंत भाचा, परमेश पराडकर, मेघा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर या प्रवाशांचा कारमध्ये समावेश आहे. मिताली मोरे या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी माहेरी येत होत्या. या अपघातात गंभीर जखमी झालेले परमेश पराडकर यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय घालवण्यात आला आहे तर विवेक मोरे हे गंभीरित्या जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com