Air fare Hike: युद्धाचा फटका विमान प्रवासाला, तिकीटाच्या दरात मोठी वाढ; किती खर्च करावा लागणार?

Air India Hikes Ticket Prices: इराण-इस्राइल युद्धाचा फटका आता विमान सेवेला बसला आहे. विमान तिकीटाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. एअर इंडियाने यासाठी मोठा निर्णय घेतला. आता विमान प्रवासासाठी किती रुपये जास्त मोजावे लागणार हे घ्या जाणून...
Air fare Hike: युद्धाचा फटका विमान प्रवासाला, तिकीटाचे दरात मोठी वाढ; किती खर्च करावा लागणार?
Air IndiaSaam Tv
Published On

Summary -

  • इराण-इस्राइल युद्धाचा फटका विमानसेवेला बसला आहे

  • या युद्धामुळे विमान प्रवास महागला आहे

  • एअर इडियाने विमान तिकीटाचे दर वाढवले

  • एअर इंडियाने विमानांवरील इंधन अधिभार वाढवण्याचा निर्णय घेतला

  • विमान इंधनाच्या किमती वाढल्यामुळे विमान तिकिटांचे दर वाढले

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता दिसून येऊ लागला आहे. या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे. इंधन, गॅसच्या दरामध्ये वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. या तणावादरम्यान विमान इंधनात लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. त्यामुळे एअर इंडिया कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने विमानांवरील इंधन अधिभार वाढवला आहे. त्यामुळे विमान प्रवास महाग झाला आहे. विमान तिकाचे दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

एअर इंडियाने ग्रुपने त्यांच्या विमानांवरील इंधन अधिभार वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांच्या तिकीटांचे दर वाढले आहे. एअर इंडियाकडून ही वाढ एकाच वेळी केली जाणार नाही. तर तीन वेगवेगळ्या टप्प्यात लागू केली जाणार आहे.

Air fare Hike: युद्धाचा फटका विमान प्रवासाला, तिकीटाचे दरात मोठी वाढ; किती खर्च करावा लागणार?
US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

मध्य पूर्वेतील तणावामुळे इंधनाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. विमान कंपन्यांच्या एकूण खर्चामध्ये इंधनाचा वाटा सर्वात जास्त म्हणजे ४० टक्के आहे. भारतामध्ये उच्च उत्पादन शुल्क आणि एटीएफवरील व्हॅटमुळे विमान कंपन्यांचा खर्च आणखी वाढतो. वाढत्या इंधनाच्या किमतींमुळे ही इंधन अधिभार वाढवणे आवश्यक असल्याचे एअरलाइनचे म्हणणे आहे. नाही तर विमान उड्डाणे करणं कठीण होऊ शकते.

Air fare Hike: युद्धाचा फटका विमान प्रवासाला, तिकीटाचे दरात मोठी वाढ; किती खर्च करावा लागणार?
Iran Israel war : तेलाचा खेळ बदलला! रशियाचा वाटा घटला, आता भारताला इंधन कुठून मिळणार?

एअर इंडिया कंपनीने ३ टप्प्यांमध्ये तिकीटांचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ नेमकी कशी आणि कोणत्या तारखेपासून लागू होणार आहे ते आपण पाहणार आहोत...

पहिला टप्पा- १२ मार्चपासून लागू होणार (नवीन बुकिंगसाठी लागू होणार)

देशांतर्गत उड्डाणे - ३९९ रुपये

सार्क देशांसाठी - ३९९ रुपये

पश्चिम आशिया / मध्य पूर्व - १० डॉलर

आग्नेय आशिया- ४० डॉलरवरून ६० डॉलरपर्यंत वाढ

आफ्रिका- ६० डॉलरवरून ९० डॉलरपर्यंत वाढ

सिंगापूर मार्ग- आतापर्यंत कोणताही अधिभार नाही. पण पहिल्या टप्प्यापासून लागू होईल.

Air fare Hike: युद्धाचा फटका विमान प्रवासाला, तिकीटाचे दरात मोठी वाढ; किती खर्च करावा लागणार?
Indigo आणि Air India मध्ये पायलटसाठी भरती; नुसता बोनसच ५० लाखांचा, तरीही वैमानिकांची ऑउटगोइंग सुरूच

दुसरा टप्पा - १८ मार्चपासून लागू होणार

युरोप- १०० डॉलर्सवरून १२५ डॉलर्सपर्यंत वाढ

उत्तर अमेरिका - १५० डॉलरवरून २०० डॉलरपर्यंत वाढ

ऑस्ट्रेलिया - १५० डॉलरवरून २०० डॉलरपर्यंत वाढ

तिसरा टप्पा -

हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरियासाठी अधिभार नंतर जाहीर केला जाईल. १२ आणि १८ मार्चपूर्वी बुक केलेल्या तिकिटांवर नवीन अधिभार आकारला जाणार नाही. पण जर तिकिटाची तारीख किंवा मार्ग बदलला तर नवीन भाडे आणि अधिभार लागू जाऊ शकतो.

Air fare Hike: युद्धाचा फटका विमान प्रवासाला, तिकीटाचे दरात मोठी वाढ; किती खर्च करावा लागणार?
Air India: इराण-इस्राइल युद्धादरम्यान एअर इंडियाचा मोठा निर्णय, 'या' देशात जाणारी विमानसेवा रद्द

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com