Air India: इराण-इस्राइल युद्धादरम्यान एअर इंडियाचा मोठा निर्णय, 'या' देशात जाणारी विमानसेवा रद्द

Iran Israel War: इराण-इस्राइलमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. दोन्ही देश एकमेकांवर हवाई हल्ले करत आहेत. इराणने आता दुबईवर देखील हल्ला केला. या युद्धाजन्य परिस्थितीदरम्यान एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला.

इराण-इस्राइल युद्धामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या तणावपूर्ण परिस्थितीमुळे विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. इराण-इस्राइल युद्धादरम्यान एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि दुबईला जाणारी सर्व विमान उड्डाणं रद्द केली आहेत. युद्धाच्या परिस्थितीमुळे प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांचा प्रवास ५ मार्चपर्यंत नियोजित होता अशा प्रवाशांना तिकिटाचा पूर्ण परतावा मिळवण्याची सुविधाही देण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला असला तरी अचानक विमान उड्डाण रद्द केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com