Remal Cyclone: रेमल चक्रीवादळचं थैमान; IMD कडून रेड अलर्ट, एअर इंडियाने रद्द केली ३००हून अधिक उड्डाणे

Remal Cyclone: IMD ने चक्रीवादळ रेमल संदर्भात रेड अलर्ट जारी केलाय. एअर इंडियाने ३०० हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. या चक्रीवादळाचा वेग ताशी ११० ते १२० किमी असणार आहे.
Remal Cyclone: रेमल चक्रीवादळचं थैमान; IMD कडून रेड अलर्ट, एअर इंडियाने रद्द केली  ३०० हून अधिक उड्डाणे
DD
Published On

भारतीय हवामान विभागाने रेमल चक्रीवादळाच्या संदर्भात अलर्ट जारी केलाय. हवामान विभागानुसार हे चक्रीवादळ आज २६ मेच्या रात्री बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकेल. बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या या वादळाचा वेग ताशी ११० ते १२० किलोमीटर असू शकतो. त्यात वाढ होऊन वादळाचा वेगही १३० ते १३५ पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळामुळे २६-२७ मे रोजी पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाने दिलाय. ईशान्य भारतातील काही राज्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात समुद्र किनाऱ्यावर न जाण्याचा इशारा देण्यात आलाय.

चक्रीवादळ रेमलचा संभाव्य प्रभाव लक्षात घेत कोलकाता विमानतळावरून एअर इंडियाची ३०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आलीत. रविवारी दुपारपासून २१ तासांसाठी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा एकूण ३९४ उड्डाणे विमानतळावरून रद्द करण्यात आली आहेत. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता एनडीआरफचे पथक पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर दाखल झाले आहे. बंगालच्या २४ परगना जिल्ह्यात एनडीआरएफ अधिकाऱ्याने सांगितले की, रेमल चक्रीवादळाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी आमची टीम सज्ज आहे.

या चक्रीवादळाचा प्रभाव प्रामुख्याने पश्चिम बंगालच्या किनारी भागात दिसेल. तर हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार ईशान्येकडील त्रिपुरा, आसाम, नागालँड आणि मणिपूर या राज्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्रिपुरास्थित प्रादेशिक हवामान केंद्रानेही २६ मे रोजी वादळ आणि पावसाची शक्यता व्यक्त केलीय. यासोबतच झारखंड आणि बिहारमध्येही वादळाचा प्रभाव दिसतोय.

Remal Cyclone: रेमल चक्रीवादळचं थैमान; IMD कडून रेड अलर्ट, एअर इंडियाने रद्द केली  ३०० हून अधिक उड्डाणे
Cyclone Remal : अतिभयंकर 'रेमल' चक्रीवादळ आज धडकणार, तुफान पाऊस कोसळणार; अनेक भागांना अलर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com