US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

US–Iran Conflict Turning Religious : अमेरिका विरुद्ध इराण युद्ध आता धार्मिक वळणावर पोहोचलंय.. युद्धात पोळलेल्या जगाला आता ट्रम्प यांनी धर्मयुद्धात ढकलण्याचा डाव आखलाय. इराणविरुद्धची लढाई ही दैवी मिशन असल्याचं सांगत ट्रम्प आपल्याच सैनिकांना भडकवत असल्याचं 11 अमेरिकन सैनिकांनी सांगितलंय.
US–Iran Conflict Turning Religious :
US–Iran Conflict Turning Religious :
Published On

हा व्हिडीओ आहे व्हाईट हाऊसच्या ओव्हलमधील. यात मध्य-पूर्वेतील देशांना युद्धाच्या खाईत लोटून हजारोंचा बळी घेणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आता थेट धर्माचं अस्त्रं उगारलंय. त्यांच्या ओव्हलमधील राष्ट्राध्यक्ष कार्यालयात ख्रिस्ती धर्मगुरु युद्धखोर ट्रम्प यांच्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.

प्रभू… आमच्या राष्ट्राध्यक्षांना शक्ती दे…

आमच्या सैनिकांचं रक्षण कर…

आणि अमेरिकेला विजय मिळवून दे…, अशी प्रार्थना ख्रिश्चन फादर यांनी केल्याचं दिसून आलंय.

आतापर्यंत इराणविरुद्धच्या युद्धात ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीसह अनेक ख्रिस्ती देशांनी ट्रम्प यांच्या युद्धखोर भुमिकेपासून अंतर राखलंय.. जगात 31 टक्के ख्रिश्चन तर 24 टक्के मुस्लीम समाज आहे. तर ट्रम्प यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन युद्ध छेडलेल्या इस्त्रायलमध्ये 0.2 टक्के इतकी लोकसंख्या असलेला यहुदी धर्म आहे. हे असं असलं तरी याआधीच पश्चिमेतील देश मुस्लीम धर्माविरुद्ध युद्ध छेडत असल्याचा आरोप इराणने केला होता.

त्यामुळे आता ट्रम्प यांच्या भुमिकेमुळे इराणचा दावा बळकट झालाय. त्यामुळे आता शिया विरुद्ध सुन्नी संघर्षामुळे मुस्लीम धर्मात दोन गट तयार झाले असले तरी हे युद्ध धर्मावर लढण्यास सुरुवात झाली तर सुन्नीबहुल देशही इराणच्या पाठिशी उभे राहण्याची शक्यता आहे.. आणि जर असं घडलंच तिसरं महायुद्ध भडकण्याचीच शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com