पायलटने 'जाणूनबुजून इंधन स्विच बंद केलं'? एअर इंडिया विमान अपघाताप्रकरणी इटालियन वृत्तपत्राचा मोठा दावा

Air India Plane Crash: एका इटालियन वृत्तपत्राच्या वृत्तानुसार भारतीय तपासकर्ते त्यांच्या अहवालात एअर इंडिया १७१ विमान पायलटच्या निष्काळजीपणामुळे कोसळलं होतं.
Air India Plane Crash
Debris of Air India Flight 171 at the crash site as investigations continue into the cause of the accident.saam tv
Published On
Summary
  • एअर इंडिया फ्लाइट १७१ अपघाताबाबत इटालियन वृत्तपत्राचा मोठा दावा.

  • पायलटने जाणूनबुजून इंधन स्विच बंद केल्याचा संशय व्यक्त.

  • भारतीय तपास अहवालात पायलटच्या निष्काळजीपणाचा उल्लेख

अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी संशय व्यक्त केला जात असतानाच देशातील मोठ्या एअर इंडियाच्या विमान अपघाताबाबत मोठा खुलासा झाला आहे.अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताबाबत एका इटालियन वृत्तपत्राने आपल्या अहवालात दावा केला आहे की, एअर इंडिया फ्लाइट १७१ पायलटच्या अॅक्शनमुळे क्रॅश झाले असं भारतीय तपासकर्ते आपल्या अहवालात म्हणू शकतात.

Air India Plane Crash
Ajit Pawar Plane Crash: अजितदादांना घातपात होण्याची शंका आधीच आली होती?

वृत्तपत्राने पाश्चात्य विमान वाहतूक संस्थांमधील सूत्रांचा हवाला देत म्हटलंय की, भारतीय तपासकर्ते त्यांच्या अंतिम अहवालात एअर इंडिया फ्लाइट १७१ का क्रॅश झाले हे उघड करू शकतात. विमान कोसळण्याचे कारण एका पायलटनं 'जाणूनबुजून' विमानाचे इंधन स्विच बंद केले होते.

Air India Plane Crash
मृतदेह खूप जास्त फुगला होता; अजित पवारांच्या मृत्यूप्रकरणी रोहित पवारांचा आणखी एक धक्कादायक खुलासा

पायलटनं "जाणूनबुजून" इंधन स्विच बंद केला

इटालियन वृत्तपत्र कोरीएर डेला सेरा यांनी पाश्चात्य विमान वाहतूक एजन्सींमधील सूत्रांचा हवाला देत म्हटलं आहे की, एअर इंडिया फ्लाइट १७१ क्रॅश होण्यामागे कारण म्हणजे वैमानिकाने 'जाणूनबुजून' इंधन स्विच बंद केला होता. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगच्या तपासणीवर आणि विमानात कोणतेही तांत्रिक दोष आढळले नाहीत, या वस्तुस्थितीवर आधारित हे निष्कर्ष आहेत.

२६० लोकांचा मृत्यू झाला होता

दरम्यान या दाव्याप्रकरणी भारताच्या विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) आणि नागरी उड्डाण मंत्रालयाशी संपर्क होऊ शकला नाहीये. २ जून रोजी, एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाचा (फ्लाइट १७१) अपघात घडला होता. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच हे विमान कोसळले. या अपघातात २६० लोकांचा मृत्यू झाला होता. दोन्ही इंजिनांचा जोर कमी झाल्यानंतर ३२ सेकंदांनी विमान वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर कोसळले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com