मृतदेह खूप जास्त फुगला होता; अजित पवारांच्या मृत्यूप्रकरणी रोहित पवारांचा आणखी एक धक्कादायक खुलासा

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे. अजितदादा यांचा मृतदेह खूप जास्त फुगला असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. यामुळे बारामती विमान अपघातावर नवीन प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Ajit Pawar Plane Crash:
Rohit Pawar addressing a press conference in Delhi over Ajit Pawar’s death case, raising serious questions about the plane crash investigation.saam tv
Published On
Summary
  • अजित पवारांच्या मृत्यूप्रकरणी रोहित पवारांचे नवे गंभीर आरोप

  • मृतदेह खूप जास्त सुजलेला असल्याचा धक्कादायक दावा

  • विमान कंपनी व डीजीसीएच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अजितदादांच्या मृत्यूप्रकरणी आमदार रोहित पवार यांनी मोठे खुलासे करण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार यांचा घातपात झाला असल्याचा संशय आमदार रोहित पवार यांनी मुबंईतील पत्रकार परिषदेत व्यक्त केला. आज दिल्लीतून रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी मोठा धक्कादायक खुलासा केलाय.

Ajit Pawar Plane Crash:
Ajit Pawar Plane Crash: अजितदादांना घातपात होण्याची शंका आधीच आली होती?

अजितदादांचा मृतदेह खूप जास्त फुगलेला होता,असा धक्कादायक खुलासा रोहित पवार यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केलाय. रोहित पवार यांनी व्हीएसआर विमान कंपनी आणि डीजीसीएसह विमानाचा वादग्रस्त पायलट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जर कंपनीवर बंदी घातली असते तर अजितदादांचा अपघात टळला असता असेही मुंबईतील पत्रकार परिषदेत ही बाब टाळली असती.

दरम्यान आता रोहित पवारांनी दिल्लीत डॉक्टरांसोबत झालेल्या चर्चेचा दाखला दिला आहे. "मी जेव्हा डॉक्टरांना विचारलं की, शरीर भाजल्यानंतर इतकं सुजतं का? तेव्हा त्यांनी हो असं उत्तर दिलं. मात्र दादांची बॉडी ही सामान्यापेक्षा खूप जास्त सुजलेली होती, असे डॉक्टर म्हणाले. ती इतकी का सुजली होती, याचं कारण शोधणं आता महत्त्वाचं आहे, असं रोहित पवार म्हणालेत.

विमान अपघातानंतर सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. यात मृतदेह ओळखता येत नव्हता. तो मोठ्या प्रमाणात फुगल्याचा दावा केला जात होता. रोहित पवारांच्या आजच्या खुलाशामुळे त्या फोटोंबाबत आणि एकूणच अपघाताच्या तीव्रतेबाबत नवीन प्रश्न उपस्थित होत आहेत. रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या या संशयामुळे आता तपासाची दिशा बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Ajit Pawar Plane Crash:
अजित पवारांचा विमान अपघात नव्हे , 100 टक्के घातपात; रोहित पवारांचा आरोप

दरम्यान रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर नागरी उड्डाण महासंचालनालय अॅक्शन मोडवर आले आहे. आज DGCA ची टीम तात्काळ बारामतीत दाखल झाले आहेत. उड्डाण महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी बारामती विमानतळाची नागरी पाहणी केली आहे. विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती, तांत्रिक सुविधा तसेच आपत्कालीन यंत्रणा यांची सविस्तर तपासणी केली आहे. विमानतळ सुरक्षित आहे का, याबाबतचा अंतिम निर्णय पाहणीनंतर तयार होणाऱ्या अहवालावर अवलंबून राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com