Ajit Pawar Water Bottle:
Rohit Pawar addressing the media while raising questions about Dada’s security and change in habits.saam tv

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांना घातपात होण्याची शंका आधीच आली होती?

Ajit Pawar Water Bottle: अजितदादांनी प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिणे बंद करून काचेची बाटलीमधून ते पाणी पीत होते. रोहित पवार यांच्या विधानामुळे अजितदादांना आधीच घातपात होणार असल्याची शंका आली होती का असा प्रश्न केला जातोय.
Published on
Summary
  • अजितदादांनी प्लास्टिकऐवजी काचेची बाटली वापरण्याचा निर्णय घेतला

  • प्लास्टिक बाटलीत इंजेक्शन टोचण्याची शक्यता असल्याची भीती

  • रोहित पवार यांच्या विधानामुळे घातपाताची शंका अधिक गडद

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी अनेक गंभीर दावे करत अजितदादांचा घातपात झाला असावा असा संशय व्यक्त केलाय. अजित पवारांना आधीची घातपाताची शंका आली होती त्यामुळेच त्यांनी आपली पाण्याची बॉटल बदलली असा दावा आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.

Ajit Pawar Water Bottle:
ऐनवेळी अजितदादांचं २७ तारखेचं शेड्यूल का बदलण्यात आलं? विमानाची वेळ का बदलली? रोहित पवार यांचा सवाल

अजित पवार यांच्या विमान अपघातसंदर्भात अनेक नेते शंका उपस्थित करत आहेत. अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. अजितदादांचा घात झाला असावा, असा संशय आमदार अमोल मिटकरी यांनी आधीच उपस्थित केला होता. दुसरीकडे शरद पवार यांनी दुर्घटनेच्या पहिल्या दिवस घातपात नसून अपघात असल्याचं म्हटलं होतं. परंतु आता पवार कुटुंबियांच्या मनातही अपघाताविषयी संशय येत आहे.

Ajit Pawar Water Bottle:
Ajit Pawar Plane Crash:"...तर अजित पवार आज जिवंत असते; रोहित पवारांचा कंपनीच्या कारभारावर संशय

आज रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अपघाताबाबत शंका उपस्थित केल्या. विमानातील ट्रान्सपॉन्डरसंदर्बात बोलताना रोहित पवार म्हणाले,"विमानाला एक ट्रान्सपॉन्डर (Transponder) असतं. यातून विमानचे लोकेशन कळत असते. विमानाचा स्पीड किती आहे? एअरपोर्टचे जे स्टिप आहे, त्याला अलाइन झालोय का? तिथून माझे अंतर किती आहे? मी किती उंचावर आहे? माझे लोकेशन कुठे आहे? हे सर्व तिथं दिले जाते.

ही सर्व माहिती आम्हाला मिळाली, पण अखेरच्या मिनिटाची माहिती कळली नाही. कदाचित ट्रान्सपॉन्डर हा मुद्दामून विमानाच्या आतून बंद केला असावा. तुम्हाला विमान टिल्ट होताना दिसतंय. तेव्हा ट्रान्सपॉन्डर बंद होतं. ८.४३.१८ वाजता ट्रान्सपॉन्डर हा बंद झाला. का बंद झाला? का कुणी बंद केला? असे प्रश्न आम्हाला असल्याचं रोहित पवार म्हणाले.

घातपात होणार याची शंका आली होती का?

रोहित पवार यांनी एका गोष्टीवर प्रकाश टाकला, आपला घातपात होणार आहे हे दादांना काही महिन्यांपूर्वी लक्षात आले होतं का, असा संशय येत असल्याचं ते म्हणाले. यासाठी त्‍यांनी एक गोष्ट करुन दाखली ती म्हणजे प्लास्टिक बाटलीत इंजेक्शन टोचता येतं. त्‍यामुळे गेल्या काही महिन्यात दादांनी कोणत्‍याही सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर प्लास्टिक बाटलीतून पाणी पिणे बंद केले होते. अजितदादा काचेची बाटली वापरत होते,

त्‍यांचे काही व्हिडीओ दिसतात की त्‍यांचा विश्वासू माणूस ती काचेची बाटली त्‍यांना पाणी पिण्यासाठी देत असायचा. मग हा प्रश्न समोर येतो की दादा पाणि पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीवरून काचेच्या बाटलीवर का आले, त्‍यांना आपले काही बेर वाईट होऊ शकते याचा अंदाज आला होता का? अशशी शंका रोहित पवार यांनी उपस्थित केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com