

इंडिगो आणि एअर इंडियामध्ये पायलटसाठी तीव्र स्पर्धा सुरू झालीय.
पायलटसाठी ५० लाख रुपयांपर्यंत जॉइनिंग बोनस दिले जात आहे.
FDTL नियमांमुळे पायलट उपलब्धतेवर परिणाम होतोय.
फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियमांमुळे इंडिगोच्या संकटानंतर विमान वाहतूक उद्योगात अनुभवी (पायलट)वैमानिकांची गरज वाढली आहे. यासाठी इंडिगो आणि एअर इंडियामध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. टीओआयच्या अहवालानुसार, कडक सुरक्षा नियमांमुळे वैमानिकांची उपलब्धता खूप कमी झाली आहे, ज्यामुळे इंडिगो आणि एअर इंडिया ग्रुपमध्ये कर्मचाऱ्यांची भरतीसह कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवण्याची तीव्र स्पर्धा सुरू झालीय. नुसता बोनस ५० लाख रुपये दिला जात असतानाही वैमानिकांचे राजीमाने देण्याचं सत्र थांबत नाहीये.
दरम्यान इंडिगोने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (DGCA) आश्वासन दिले आहे की, अशी परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ते कर्मचाऱ्यांच्या भरतीत लक्षणीय वाढ करण्यात येणार आहे. याअंतर्गत जानेवारीमध्येच सुमारे १०० वैमानिकांची भरती करण्यात येणार आहे. एअर इंडियानेही रिक्त पदांची घोषणा केली.
दुसरीकडे एअर इंडियानेही चांगल्या उड्डाण ऑपरेशन्ससाठी कॉकपिट रँक मजबूत करण्यासाठी पाटयल अर्थात वैमानिकांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. एका बाजुला भरती केली जातेय, दुसऱ्या बाजुला वैमानिक राजीमान्यांवर राजीनामे देत आहेत. अनेक पायलट (वैमानिक) देशांतर्गत एअरलाइन्स कंपन्यां बदलत आहेत. तर काही पायलट भारत सोडून परदेशी एअरलाइन्स कंपन्यांमध्ये नोकरीसाठी जात आहेत.
दरम्यान इंडिगो आणि एअर इंडिया या कंपन्या नवीन वैमानिकांना नियुक्त करण्यासह विद्यमान वैमानिकांना कायम ठेवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. याचमुळे दोन्ही विमान कंपन्या त्यांच्या वैमानिकांना आकर्षक ऑफर देत आहेत. दोन प्रमुख एअरलाइन्सपैकी एका एअरलाइन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, वैमानिकांना ५० लाख रुपयांपर्यंतचे बोनस देण्याचे ऑफर येत आहेत. हे बोनस जॉइनिंगच्या वेळी दिला जातोय.
त्यात नवीन FDTL नियमांनुसार, अनुभवी वैमानिकांची कमतरता आणखी तीव्र होईल. दुसरीकडे इतर एअरलाइन्स पायलट लोकांना नव नव्या ऑफर देऊन त्यांना नोकरी देत आहेत. त्यामुळे आम्ही पायलट कुठून आणणार, असं एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान बोनस देणं हे पहिल्यांदाच घडत नाहीये. एका वरिष्ठ पायलटच्या म्हणण्यानुसार, इंडिगोने याआधीही अनुभवी पायलट लोकांना त्यांच्या जुन्या नियोक्त्यांना कराव्या लागणाऱ्या बाँड पेमेंटची भरपाई करण्यासाठी जॉइनिंग बोनस दिला होता. त्यावेळी बाँडची रक्कम साधारणपणे ५ लाख ते १५ लाख रुपयांच्या दरम्यान होती, तेव्हा हे बोनस १५ लाख रुपयांपासून २५ लाख रुपयांपर्यंत दिले जात होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.